आयटीआय सिग्नलजवळ रिक्षावर झाड कोसळून दोघे ठार

गुलमोहोर वृक्षाने पुन्हा केला घात

नवीन नाशिक : शहरातील त्रंबक रस्त्यावरील आयटीआय सिग्नलवर गुलमोहोरचे झाड रिक्षावार पडून दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.
नागरिकांनी धाव घेत प्रवाशांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोठी फांदी रिक्षावर (एम एच १५ एफ यू ०३६०) पडल्याने या चालकासह प्रवाशांना वाचवण्यात अपयश आले. अग्निशामक दलाकडून फांदी तोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून रिक्षातील चार ही व्यक्तींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. यातील दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर आहेत.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा अनावश्यक वृक्षांना तसेच शहरातील धोकादायक वृक्षांना स्थलांतरित करण्याचा मुद्दा चर्चिला जात आहे. पालिका प्रशासनाने तातडीने याची दखल घेण्याची मागणी नागरिक करत आहेत.