बहिणीची छेड काढल्याच्या वादातून तरुणाचा खून

पंचवटी : बहिणीची छेड काढल्याच्या वादातून बुधवारी (दि.२२) रात्री १० वाजेदरम्यान निलगिरी बागेत राहणार्‍या एका तरुणाचा दुसर्‍या तरुणाने धारदार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी हल्लेखोर तरुणाला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी आडगाव पोलीस ठायिात गुहिा दाखल करयिात आला आहे. विकास रमेश नलावडे (वय २५, रा. नाशिक) असे मृयिू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल साळवे (वय २७, रा.निलगिरी बाग, औरंगाबाद रोड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औरंगाबाद रोडवरील निलगिरी बाग येथे राहणारा विकास नलावडे (वय २५) हा बहिणीची नेहमी छेड काढत होता. यिातून संशयित साळवे व नलावडे यांच्यात वाद झाले होते. बुधवार (दि.२२) रोजी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास नलावडे याने संशयित साळवे यास निलगिरी बाग येथील बिल्डिंग न. ५ जवळ असलेल्या पटांगणात भेटावयास बोलावले आणि मी तुयिा बहिणी सोबत लग्न करेन असे सांगितले. यात संशयित अमोल साळवे यास राग आला. यिाने धारधार शस्त्राने विकास नलावडे याच्यावर वार केला. यिात विकास रक्ताच्या थारोळ्यात पडला. ही बाब नागरिकांना समजताच यिांनी विकासला उपचाराथि डॉ. वसंतराव पवार वैद्यकीय रुग्णालय येथे दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान यिाचा मृयिू झाला. याप्रकरणी संशयित अमोल साळवे याचेसह दोघांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास आडगाव पोलीस करीत आहेत.

आडगाव पोलिस ठायिाचे वरिष्ठ पोलीस निरीकि इरफान शेख यांच्या मागदिशनिाखाली सहायक पोलीस निरीकि हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीकि अशोक पाथरे, सहायक पोलीस उपनिरीकि भास्कर वाढवणे, पोलीस हवालदार सुरेश नरोडे, पोलीस नाईक गणेश देसले, निलेश काटकर, दादासाहेब वाघ, देवराज सुरंजे, पोलीस अंमलदार दिनेश गुंबाडे, सचिन बाहिकर, अमोल देशमुख, गणेश माळी यांनी तपासाचे चक्रे फिरवत संशयितासह दोघांना ताब्यात घेतले.