Tuesday, June 22, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक वालदेवी धरणात बुडून पवन नगरातील तरुणाचा मृत्यू

वालदेवी धरणात बुडून पवन नगरातील तरुणाचा मृत्यू

कोरोनामुळे काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते

Related Story

- Advertisement -

वालदेवी धरणावर पोहण्यासाठी गेलेल्या पवन नगरातील तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. धरणातून बाहेर आल्यावर हा तरुण बुडाल्याचे इतर मित्रांच्या निदर्शनास आल्यानंतर शोधाशोध सुरू केली. अखेर दोन तासांनी त्याचा मृतदेह सापडला.

पवननगर येथील ५ ते ६ तरुण पोहण्यासाठी वालदेवी धरणावर गेले होते. या सर्वांनी पोहोण्याचा आनंद घेतला. मात्र, बाहेर आल्यावर कमलेश परत आला नसल्याचे तरुणांच्या लक्षात आले. बराच शोध घेऊनही तो सापडला नाही. ही माहिती मिळताच गावकऱ्यांनी पोलीस पथकासोबत शोध सुरू केला. त्यानंतर दोन तासांनी त्याचा मृतदेह आढळून आला. कमलेश सोनवणे हा पवननगर येथील गणपती मंदिरामागे राहत होता. दुर्दैव म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचे कोरोनामुळे निधन झाल्याचे सांगितले जाते आहे.

- Advertisement -