आपलं महानगर लवकरच आपल्या नाशिकमध्ये

नाशिकच्या विश्वात पदार्पण करत असलेल्या आपलं महानगरच्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा गुरुवार १७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे.

nashik apala mahanagar paper
नाशिकमध्ये आपलं महानगर

गेल्या दोन दशकापेक्षा अधिक काळापासून मुंबईमध्ये निर्भीड पत्रकारीता करणारे दैनिक ‘आपलं महानगर’ आता नाशिकमध्ये पुढचे पाऊल टाकत आहे. खणखणीत बातम्या आणि रोखठोक भूमिकांमुळे मुंबईकरांच्या विश्वासाहर्तेचे प्रतीक बनलेले दैनिक आपलं महानगर येत्या १८ जानेवारीपासून नाशिककरांच्या भेटीला येत आहे. आपलं महानगर या दैनिकाचे संपादक संजय सावंत असून आपलं महानगर नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक मिलिंद सजगुरे हे आहेत. नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांच्या बातम्या या दैनिकात वाचता येणार आहे.

नाशिकच्या विश्वात पदार्पण करत असलेल्या ‘आपलं महानगर’च्या नाशिक आवृत्तीचा प्रकाशन सोहळा गुरुवार १७ जानेवारी २०१९ रोजी होणार आहे. या प्रकाशन सोहळ्याला जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन, ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे, नाशिकच्या महापौर रंजना भानसी, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव हेमंत टकले, मनसेचे ज्येष्ठ नेते प्रदीप पवार हे प्रमुख पाहुणे उपस्थित राहणार आहेत. नाशिकच्या महाकवी कालिदास कलामंदिर याठिकाणी १७ जानेवारी २०१९ रोजी दुपारी १ वाजता प्रकाशन सोहळा होणार आहे.