घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रश्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे कोरोनाबाधित

श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष आशुतोष काळे कोरोनाबाधित

Subscribe

फेसबूक पोस्टनंतर समर्थकांची उडाली धांदल

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे नवनियुक्त अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार आशुतोष काळे कोरोनाबाधित झाले आहेत. फेसबूकवरुन त्यांनी स्वत:च ही माहिती देत संपर्कात आलेल्यांना सावध केले आहे. त्यामुळे त्यांच्या संपर्कातील काळे समर्थकांमध्ये खळबळ उडाली आहे.

काळे यांनी रविवारी (दि.१९) त्यांच्या फेसबूक अकाऊंटवरून ‘माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून, मागील काही दिवसांत माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. तसेच स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी’, अशी पोस्ट केली आहे. त्यामुळे काळे समर्थकांमध्ये व संपर्कातील सर्वांचीच धांदल उडाली आहे.

- Advertisement -

गुरुवारी (दि.१६) सायंकाळी उशीरा राज्य शासनाने श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिध्द केली. यात काळे यांना अध्यक्ष पदावर संधी मिळाली. 17 सप्टेंबरलाच त्यांनी पदभारही स्वीकारला. यावेळी समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. दरम्यान, श्री साईबाबांच्या व आपल्या सर्वांच्या आशिर्वादाने मी लवकरच बरा होऊन आपल्या सेवेत रुजू होईल, असेही काळे यांनी म्हटले आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -