घरमहाराष्ट्रनाशिकपोलीस स्टेशनमध्येच नशाधिन तरुणाचा धिंगाणा

पोलीस स्टेशनमध्येच नशाधिन तरुणाचा धिंगाणा

Subscribe

पोलिसांना धक्काबुक्की आणि शिवीगाळ

नशाधिन तरुणाने थेट पोलिस स्टेशनध्येच धिंगाणा घालत पोलिसांना धक्काबुकी केल्याची घटना शनिवारी, २० जुलैला घडली. याप्रकरणी पोलिसांनी जलालपूर येथील यशवंत सुधाकर जाधव याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करत अटक केली आहे.

जलालपूर येथे जाधव कुटुंबीयांचे अन्य ग्रामस्थांमध्ये वाद झाले. त्याबाबत जाधव यांच्या विरोधातील तक्रार तालुका पोलिसांतही करण्यात आली होती. संशयित जाधव या तक्रारीविरोधात तक्रार देण्यासाठी तालुका पोलिसांत आला होता. आपापसांत भांडणे करण्याबाबत पोलिसांनी त्यास जाब विचारला. राग अनावर झाल्याने त्याने माझी तक्रार दाखल करून घ्या, असे म्हणत पोलिसांसमोरच गोंधळ घालण्यास सुरूवात केली. नशेच्या भरात त्याने पोलीस ठाण्यातील टेबल उलटवून टाकला. महिला पोलिस कर्मचार्‍यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली.

- Advertisement -

पुरूष पोलीस कर्मचार्‍यांनी धाव घेत त्यास रोखण्याचा प्रयत्न करताच त्याने त्यांनाही धक्काबुक्की केली. सर्वांनी त्याला पकडले. याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणणे, महिला पोलिसाला अश्लिल शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -