घरमहाराष्ट्रनाशिकVideo | पंचवटीतील तारवाला नगर चौफुलीवर ट्रक आणि सिटी बसचा अपघात

Video | पंचवटीतील तारवाला नगर चौफुलीवर ट्रक आणि सिटी बसचा अपघात

Subscribe

सकाळी सहा वाजेच्या सुमारास घडली घटना

पंचवटीतील तारवाला नगर येथील सिग्नलवर शनिवार  सकाळी सहा ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान ट्रक आणि बसचा  अपघात झाला. सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी देखील  शहर बस आणि ट्रकचे मात्र नुकसान झाले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिकृत माहिती अशी की, शनिवार (दि.३१) रोजी निमाणीहुन दिंडोरी रोडकडून  म्हसरूळकडे जाणारी सिटी बस क्रमांक एमएच १ अेके ८०९३ जात होती. सकाळी सहा ते सव्वा सहा वाजेच्या दरम्यान शरदचंद्रजी पवार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्ड कडून भरघाव वेगाने ट्रक क्रमांक एमएच ४५ टी ६६६७ ने तारवाला नगर सिग्नलवर सिटी बसला धडक दिली. या अपघातात सिटी बस व ट्रकचे नुकसान झाले असून सुदैवाने बसमध्ये प्रवाशी नसल्याने जीवितहानी झालेली नाही, मात्र या अपघातात शहर बस आणि ट्रकचे मोठे नुकसान झाले असून या अपघाताची माहिती पोलिसांना कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पुढिल तपास पंचवटी पोलीस करीत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -