Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र नाशिक जयभवानी रोडला अपघात; दुचाकीस्वार महिला ठार, एक गंभीर

जयभवानी रोडला अपघात; दुचाकीस्वार महिला ठार, एक गंभीर

Related Story

- Advertisement -

नाशिक येथील जयभवानी रोडवर कारच्या धडकेत दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. एक महिला गंभीर जखमी असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास सुरु आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, जयभवानी रोड फर्नांडीस वाडी येथी गार्डनसमोर रविवारी (दि.५) सायंकाळी साडेसात वाजता आर्टीलरी सेंटरकडून उपनगरच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारी फोर्ड फिगो कारने (एमएच ०२ सीबी ९३२१) समोरुन येत असलेल्या दुचाकीला (एमएच १५ जीसी ५६३६) जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील सुरेखा दिलीप शिंदे (रा. माऊली लॉन्स, बेलतगव्हाण) या जागीच ठार झाल्या, तर गायत्री रवी गंधारे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून फोर्ड फिगो चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस तपास सुरु आहे.

- Advertisement -