विवाहासाठी गेलेल्या तरुणाचा अपघाती मृत्यू

kargil to srinagar zojila pass road accident tavera vehicle fell 500 feet in zojila ditch 8 people feared dead
कारगिलहून श्रीनगर मार्गावरील 500 फूट खोल दरीत कोसळली कार; ८ जणांचा मृत्यू झाल्याची भीती

विवाहासाठी नाशिकहून हरसूलकडे जात असताना ओम्नी कार झाडावर आदळल्याने एक तरुण ठार व दोन तरुण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२७) दुपारी एक वाजेदरम्यान वाघेरा घाटात घडली. याप्रकरणी हरसूल पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. दीपक सुनील गांगुर्डे (वय २४, रा. प्रबुद्धनगर, सातपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर गणेश विठ्ठल माळेकर (रा. बेळगाव ढगा, ता. नाशिक) असे जखमी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सातपूर येथून आठजण विवाहासाठी ओम्नी कारने हरसूल-पेठ रोडने जात होते. भरधाव ओम्नी कारवर चालकाला नियंत्रण मिळवता आले नाही. त्यामुळे कार वाघेरा घाटातील झाडावर आदळली. त्यात कारचालकाशेजारी बसलेल्या दीपक गांगुर्डे याचा मृत्यू झाला. तर दोन तरुण जखमी झाले. जखमींवर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पुढील तपास पोलीस हरसूल पोलीस करत आहेत.