घरमहाराष्ट्रनाशिकरस्त्याचे काम देतंय अपघातांना आमंत्रण

रस्त्याचे काम देतंय अपघातांना आमंत्रण

Subscribe

कामटवाडे परिसरातील समस्येमुळे नागरिक हैराण

सिडको परिसरातील कामटवाडे रस्त्यावर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाचे काम नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पाईपलाईन आणि ड्रेनेजच्या कामासाठी केलेले खड्डे अपघातांना कारणीभूत ठरत आहेत. हे खड्डे व्यवस्थित न बुजवले गेल्याने पावसामुळे तेथे चिखलाचे साम्राज्य पसरले असून अनेक वाहने चिखलात फसत आहेत. तसेच वाहने घसरून अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. दरम्यान, याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

सिडको परिसरातील त्रिमूर्ती चौक ते माऊली लॉन्स दरम्यान रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरु असून रस्त्याच्या कडेला ड्रेनेजची कामे महापालिकेकडून सुरू आहेत. या कामासाठी कामटवाडे रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे करण्यात आले असून विटा, वाळू आणि पाईप आणून टाकले गेले आहेत. या खड्ड्यांतून काढलेल्या मातीचे ढिगारे अनेक ठिकाणी ठेवले असून गेल्या दोन दिवसांपासून पडणार्‍या पावसामुळे रस्त्यावर सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे रस्त्यावर दुचाकीचालक घसरून पडत असल्याने अपघात वाढले आहेत. कामटवाडा रस्त्यावर मटाले मंगल कार्यालय, प्रगती नगर, कामटवाडे गाव, धनवंतरी कॉलेज या ठिकाणी काम सुरू असून जेसीबीच्या सहाय्याने मोठे खड्डे केले जात आहेत. या कामात ठेकेदाराकडून कुठलेही नियोजन नसल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

त्यामुळे या परिसरातील नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. दोन दिवसांपासून शहरात सुरू असलेल्या पावसामुळे बुजवलेल्या पाईप लाईन आणि ड्रेनेज खड्ड्यांमुळे या परिसरातील वाहने चालवणे मुश्कील झाले आहे. तर काही ठिकाणी या खड्ड्यांमध्ये वाहने अडकत असल्याची चित्र आहे. असलेली या कामासाठी रस्त्यावरील लाईट बंद करण्यात आली असून रात्रीच्या वेळी चिखलाचा अंदाज न आल्याने परिसरात अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -