Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी गुजरातमध्ये खून करणार्‍या आरोपीच्या नाशिकमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या

गुजरातमध्ये खून करणार्‍या आरोपीच्या नाशिकमध्ये पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Related Story

- Advertisement -

गुजरातमधील नानी दमन येथील आठ महिन्यांपासून खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी नाशिकमध्ये असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. जयराम श्रावण लोंढे (रा.गांधीधाम, देवळाली गाव, नाशिक) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिक शहर व राज्याबाहेरील गुन्ह्यातील पाहिजे असलेल्या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याच्या सूचना पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आहेत. त्यानुसार नाशिक शहर पोलिसांनी पेट्रोलिंग सुरु केले आहे. दरम्यान, गुजरातमधील नानी दमन पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी नाशिक शहरात असल्याची माहिती सहायक पोलीस उपनिरीक्षक शामराव भोसले यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी देवळाली गावातून आरोपी जयराम श्रावण लोंढे यास सापळा रचून अटक केली. त्यास पुढील कारवाईसाठी गुजरातमधील नानी दमण पोलीस ठाण्यातील पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

- Advertisement -