घरक्राइमवाहतूक पोलिसाला धक्काबुक्की,आरोपीला सहा महिन्याचा तुरुंगवास

वाहतूक पोलिसाला धक्काबुक्की,आरोपीला सहा महिन्याचा तुरुंगवास

Subscribe

घटना ५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान पाथर्डी फाटा, शहर वाहतूक शाखा, युनिट तीन, पोलीस चौकीच्या बाजूला घडली

नाशिक : वाहतूक पोलिसाला शिवीगाळ, धक्काबुक्की व धमकी देणार्‍या आरोपीस न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गुरुवारी (दि.१२) सहा महिने साधा कारावास, दोन हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास एक महिना साधा कारावास अशी शिक्षा सुनावली. राजेंद्र बळीराम सोनवणे (वय ५४, रा. अयोध्यानगरी क्रमांक एक, अमृतधाम, पंचवटी) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना ५ जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ५.३० वाजेदरम्यान पाथर्डी फाटा, शहर वाहतूक शाखा, युनिट तीन, पोलीस चौकीच्या बाजूला, नाशिक येथे घडली होती.

राजेंद्र सोनवणे व सुनील धनू जाधव (वय ३८, रा. साई अ‍ॅव्हेन्यू अपार्टमेंट, समर्थनगर, नाशिक) हे कार (एमएच १५-डी ५१८३)ने पाथर्डी गावाकडून अंबड गावाकडे जात होते. ते पाथर्डी फाटा परिसरात आले असता कारने अपघात केला. वाहतूक शाखेचे पोलीस नाईक सचिन जाधव यांनी कार पोलीस चौकीला घेऊन येण्यास सांगितले. त्यावेळी दोघांनी संगनमत करून कार अंबड गावाच्या दिशेने पळवून नेत असताना पोलीस नाईक जाधव यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. त्यात त्यांच्या गणवेशांची दोन बटणे व नेमप्लेट तुटली. दोघांनी जाधव यांना धमकी देवून शासकीय कामात अडथळा आणला.

- Advertisement -

याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक एम. डी. म्हात्रे यांनी तपास करत आरोपींविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायाधीश एम. ए. शिंदे यांनी गुरुवारी (दि.१२) फिर्यादी, साक्षीदार, पंच यांनी दिलेली साक्ष आणि तपासी अंमलदारांनी सादर केलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरुन राजेंद्र सोनवणे यास शिक्षा सुनावली. सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता म्हणून आर. वाय. सूर्यवंशी यांनी कामकाज पाहिले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -