घरताज्या घडामोडीराष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 246 विद्यार्थ्यांचे यश

राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत 246 विद्यार्थ्यांचे यश

Subscribe

मराठा हायस्कूलचा जयेश पाटे जिल्ह्यात प्रथम; प्रणव पवार, प्रतिक शेलार यशस्वी

नाशिक : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने आर्थिक दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील 246 विद्यार्थ्यांनी देदिप्यमान यश मिळवले आहे. मविप्र शिक्षण संस्थेच्या मराठा हायस्कूलचा विद्यार्थी जयेश पाटे यांने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला असून गंगापूर येथील देवराम पाटील शाळेतील प्रणव पवार व प्रतिक शेलार यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
राज्याच्या आरक्षणानुसार महाराष्ट्रातील 11 हजार 682 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय शिष्यवृत्ती परीक्षेतून दरवर्षी निवड केली जाते. इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी मराठी, उर्दु, हिंदी, गुजराती, सिंधी, तेलगु, कन्नड व इंग्रजी माध्यमातून ही परीक्षा घेण्यात येते. बौध्दिक क्षमता चाचणी (मॅट) व शालेय क्षमता चाचणी (सॅट) हे दोन पेपर विद्यार्थ्यांना सोडवावे लागतात. ‘मॅट’च्या पेपरमध्ये 81 प्रश्न तर ‘सॅट’मध्ये 90 प्रश्न हे एकूण 171 गुणांसाठी देण्यात आले होते. इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना 167 गुणांसाठी हे प्रश्न दिले होते. राज्य परीक्षा परिषदेनी यापैकी इंग्रजीचे एकूण 13 प्रश्न रद्द केले आहेत. तर इतर माध्यमांचे 9 प्रश्न रद्द करत विद्यार्थ्यांचा अंतिम नुकाल ऑनलाईन जाहीर केला. नाशिक जिल्ह्यात एकूण 246 विद्यार्थी यशस्वी झाले असून यात सर्वसाधारण प्रवर्गातील 48, अनुसूचित जाती (एससी) 6, अनुसूचित जमाती (एसटी) 95, भटक्या जमाती (व्हीजे) 3, भटक्या जमाती (ब)2, क-2, भटक्या जमाती (ड)-25, इतर मागास प्रवर्ग (ओबिसी) 62, विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी) 1 व दिव्यांग चार विद्यार्थ्यांचा समावेश आहे. उर्त्तीण विद्यार्थ्यांना वार्षिक सहा हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या सर्व विद्यार्थ्यांची यादी राज्य परीक्षा परिषदेनी ऑनलाईन प्रसिध्द केली आहे.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -