घरमहाराष्ट्रनाशिकबेकायदेशीर महा ई-सेवा केंद्रांवर कारवाई

बेकायदेशीर महा ई-सेवा केंद्रांवर कारवाई

Subscribe

नाशिक : निफाड तालुक्यातील म्हाळसा-कोरे येथील महा ई सेवा केंद्रावर उत्पन्न व जात प्रमाणपत्रासाठी पाचशे ते सातशे रूपये आकारले जात असल्याचे निदर्शनास आल्याने या प्रकरणाची आयोगाने गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले. या आदेशानुसार उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे यांनी संबंधित केंद्राचा परवाना एका वर्षासाठी रद्द केला आहे. प्रत्येक केंद्राने दरसूची लावणे व तेवढेच शुल्क आकारणे बंधनकारक आहे. या केंद्रांच्या तपासणीचे अधिकार आयोगाला आहेत. केंद्रांना भेट देण्यात येत आहेत. या भेटीदरम्यान ई-सेवा केंद्रातून प्रमाणपत्रासाठी पैसे घेतले जात असल्याचे निदर्शनास आले होते. त्यानूसार ही कारवाई करण्यात आली.

आयोगाकडून यापुढेही वेगवेगळया तालुक्यातील केंद्रांना भेटी देऊ. केंद्र चालकांनी नियमानुसार काम करावे. कोणतीही अनियमितता आढळल्यास तसेच नागरिकांची दिशाभूल करणे, त्यांच्याकडून अवाजवी दराने पैसे घेणे असे प्रकार आढळल्यास केंद्रचालकाविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल. तसेच, अशा केंद्रांची तक्रार नागरिकांनी संबंधित जिल्हाधिकारी किंवा आयोगाच्या नाशिक कार्यालयांकडे 0253,2995080 या दूरध्वनी क्रमांकावर करावी. : चित्रा कुलकर्णी, आयुक्त, लोकसेवा हक्क आयोग, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -