घरमहाराष्ट्रनाशिककामचुकार सफाई कर्मचार्‍यांवर होणार कारवाई; आयुक्तांचे निर्देश

कामचुकार सफाई कर्मचार्‍यांवर होणार कारवाई; आयुक्तांचे निर्देश

Subscribe

सफाई कर्मचारी व ठेकेदारांसोबत आढावा बैठकित आयुक्त रमेश पवार यांचे निर्देश

नाशिक : शहरातील घनकचरा व्यवस्थापन विभागांतर्गत सर्व विभागीय स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता निरीक्षक व घंटागाडी तसेच साफसफाई काम करणारे ठेकेदार यांची आढावा बैठक गुरुवारी (दि. १९) नाशिक महापालिकेतील रेकॉर्ड हॉल येथे आयुक्त रमेश पवार यांच्या उपस्थितीत झाली. शहरात कुठल्याही विभागात अचानक भेट देण्यात येऊन कामचुकारपणा करणारे आणि विनापरवानगी गैरहजर असणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिलेत.

या बैठकीस घनकचरा विभागाचे उपायुक्त विजयकुमार मुंडे, संचालक डॉ.आवेश पलोड तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी आयुक्तांनी शहरातील सर्व विभागातील स्वच्छतेबाबत आढावा घेतला. तसेच शहर स्वच्छतेस प्रथम प्राधान्य देणार असल्याचे सांगून शहरात कुठल्याही विभागात अचानक भेट देण्यात येऊन कामचुकारपणा, गैरहजर असणार्‍या कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याचे संकेत दिले. शहरातील रस्ते व दुभाजक यांच्या स्वच्छतेवर भर देण्याच्या सूचना यावेळी करण्यात आल्या. तसेच दुभाजक व रस्त्याची सफाई करताना कर्मचारी यांनी पुरेशी सुरक्षा बाळगण्याबाबत यावेळी सांगण्यात आले.

- Advertisement -

 

घंटागाडी ठेकेदारांना या केल्या सूचना

– वारंवार प्लास्टिक कचरा फेकणारे यांचा शोध घेऊन कारवाई करावी
– शहरात कुठेही कचरा साठून राहणार नाही
– पावसाळी नाले व गटारींवरील झाकणांवरअसणारा कचरा साफ करावा
– शहरातील कचरा वाहतूक करतांना गाडीतील कचरा रस्त्यांवर उडणार नाही याची काळजी घ्यावी
– एकदा वापरात येणार्‍या प्लास्टिकाचा पुनर्वापर करणार्‍या मंगलकार्यालय, हॉलवर कारवाई करावी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -