Saturday, September 18, 2021
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र होर्डिंग, पोस्टर्सवरील भाऊ-दादांवर होणार कारवाई

होर्डिंग, पोस्टर्सवरील भाऊ-दादांवर होणार कारवाई

होर्डिंगसाठी पोलिसांचा आता परवानगी क्रमांक आवश्यक : पोलीस आयुक्त

Related Story

- Advertisement -

शहरातील होर्डिंग, पोस्टर्स, फ्लेक्स, बॅनरमुळे होणारे विद्रुपीकरण रोखण्यासाठी नाशिक शहर पोलिसांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. स्वत:ची मार्केटिंग करण्यासाठी रस्त्यावर आणि चौकाचौकांत बेकायदा होर्डिंग, पोस्टर लावून शहर विद्रूप करणार्‍या भाऊ-दादांवर पोलीस कारवाई करणार आहेत. होर्डिगसाठी लावण्यासाठी पोलीस परवानगी क्रमांक देणार आहेत. कारवाई टाळण्यासाठी तो क्रमांक होर्डिगजवर लावणे बंधनकारक राहणार आहे.

शहरातील उपनगरांसह विविध सोसायट्यांमध्ये अनेक दादा व भाऊ वाढदिवसानिमित्त त्यांच्याकडून आणि समर्थकांकडून चौकाचौकात होर्डिग, पोस्टर्स लावले जातात. अनेक पोस्टरवर आक्षेपार्ह मजकूर असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. तसेच, राजकीय पुढार्‍यांचे वाढदिवस, सभा, मोर्चे यासह विविध कार्यक्रमांच्या जाहिरातींमुले अवैध होर्डिंगची संख्या वाढत आहे. यातील अनेक होर्डिग अवैध असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे.

- Advertisement -

आगामी नवरात्र उत्सव, दसरा, दिवाळी, नवीन वर्ष, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी तयारी सुरु केली आहे. महापालिकेने ठरवून दिलेल्या 129 अधिकृत जागेवरसुद्धा होर्डिंग लावण्यापूर्वी पोलिसांची परवानगी गरजेची राहणार आहे. अनाधिकृत होर्डिंग राजकीय, सामाजिक, जाहिरात स्वरूपात असले तरी संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच अनधिकृत ठिकाणी श्रद्धांजली, धार्मिक तसेच जातीय तेढ निर्माण करणारे होर्डिंग थेट जप्त करून त्याची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. बेकायदा होर्डिंग लावल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हेसुद्धा दाखल केले जाणार आहेत.

नाशिक शहरात १२९ ठिकाणी होर्डिंग लावण्यास परवानगी आहे. होर्डिंग परवानगीबाबत महापालिका आयुक्त कैलास जाधव यांच्याशी चर्चा झाली आहे. महापालिकेकडून होर्डिंग, बॅनरसाठी परवानगी पत्र आयुक्त कार्यालयात आल्यानंतर त्यावर छापण्यात येणारा मजकूराची तपासणी करुनच परवानगी क्रमांक देण्यात येणार आहे. विना परवानगी होर्डिंग लावणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. अनाधिकृत होर्डिंग, बॅनरवर कारवाई करण्यासाठी लवकर आदेश काढला जाणार आहे.
दीपक पण्डेय, पोलीस आयुक्त

- Advertisement -