घरमहाराष्ट्रनाशिक‘आठवणी ल. जि. उवाच’ हे जाणिवांचे दर्शन घडविणारे पुस्तक

‘आठवणी ल. जि. उवाच’ हे जाणिवांचे दर्शन घडविणारे पुस्तक

Subscribe

व्याख्याते व विचारवंत प्रकाश पाठक यांचे प्रतिपादन

नाशिक : अ‍ॅड. लक्ष्मण उगांवकर यांचे पुस्तक म्हणजे जगणे आहे. ते कसे जगले, याचा सर्वांवर संस्कार व्हावा, असे हे पुस्तक आहे. अर्थात जाणिवांचे दर्शन घडविणारे हे पुस्तक आहे, असे प्रतिपादन व्याख्याते व विचारवंत प्रकाश पाठक यांनी केले.

अ‍ॅड. लक्ष्मण जिजाजी उगांवकर लिखीत ‘आठवणी ल. जि. उवाच’ प्रकाशन सोहळा रविवारी (दि. १७) सायंकाळी ५ वाजता गंगापूर रोडवरील कुर्तकोटी सभागृहात पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅड. लक्ष्मण उगांवकर, केटीएचएमचे प्राचार्य डॉ. व्ही. बी. गायकवाड, माजी आमदार हेमंत टकले यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाश करण्यात आले. याप्रसंगी उगांवकर कुटुंबियांतर्फे अ‍ॅड. उगांवकर यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वैनतेय शाळेचे दामोदर यांनी अ‍ॅड. उगांवकर यांच्यावर तैलचित्र तयार केले. त्यानिमित्त त्यांचाही सत्कार करण्यात आला.

- Advertisement -

याप्रसंगी हेमंत टकले म्हणाले की, वयाच्या नव्वदी पार असलेले गृहस्थ म्हणजे आप्पासाहेब उर्फ अ‍ॅड. उगावकर. त्यांना समाजकार्य, शिक्षण, कुटुंब, संस्था प्रगतीचे व्यसन आहे. त्यामुळे ते आजही समाजाचा आधार भक्कम आहेत. ते तत्वनिष्ठ असून, त्यांनी समाजासमोर आदर्श ठेवला आहे. यावेळी अ‍ॅड. दौलतराव घुमरे, बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. नितीन ठाकरे, अ‍ॅड. भगीरथ शिंदे, मधुरा बक्षी, हेमंत बक्षी, अ‍ॅड. अंजली पाटील, गोपाळ पाटील, पूजा उगांवकर, अपर्णा कांडलीकर, रोहित उगांवकर आदी उपस्थित होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -