घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरे आणि सुशांत सिंह प्रकरणाचा संबंध नाही : छगन भुजबळ

आदित्य ठाकरे आणि सुशांत सिंह प्रकरणाचा संबंध नाही : छगन भुजबळ

Subscribe

आदित्य ठाकरे यांच्यासाठी राष्ट्रवादीचे नेते राज्याचे पुरवठामंत्री छगन भुजबळ मैदानात उतरले आहेत. आदित्य ठाकरे यांचा सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाशी काडीचाही संबध नाही अशी भुमिका मांडत भुजबळ यांनी आदित्य ठाकरे यांना क्लिनचीट दिली आहे. तर पार्थ पवारांबाबत बोलतांना ते म्हणाले की, शरद पवार हे आमचे कुटुंब प्रमुख असून कोणी चुकत असेल तर कान पकडण्याचा त्यांना पुर्ण अधिकार आहे. सरकार पडेल कि टिकेल हे सांगायला मी काही ज्योतिषी नाही असा टोलाही त्यांनी राणेंना लगावला.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी विसंगत भुमिका घेतल्याने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पार्थ यांना जाहीररित्या फटकारले. त्यामुळे अजित पवार सध्या नाराज असून याचे पडसाद आगामी काळात उमटण्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत भुजबळ यांना विचाले असता ते म्हणाले, पवार कुटुंबियांमध्ये कोणताही कलह नाही. कोणीही नाराज नाही. आम्हीही पवार कुटुंबियांपैकीच एक आहोत. पवार साहेब हे आमचे कुटुंबप्रमुख आहेत ते ज्येष्ठ आहेत. घरचा कोणी चुकला तर त्यांना समजावून सांगणे हे त्यांचे काम आहे. अगदी मी चुकलो तरी माझा कान ते धरतात आणि मला सुध्दा ऐकवतात असे ते म्हणाले. सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरे यांचा काडीमात्र संबध नाही. उगीच कुणाची तरी बदनामी करणे योग्य नाही. मी मुंबईचा महापौर, आमदार होतो गृहखातेही मी सांभाळलेले असल्याचे ते म्हणाले. भाजप नेते खा. नारायण राणे यांनी राज्यातील सरकार लवकरच कोसळेल असे म्हटले आहे याबाबत बोलतांना भुजबळ म्हणाले, मी हस्तरेषाही बघत नाही ज्योतीषही पाहत नाही. मी एक मानतो नियतीने आपल्याला काम करण्याची जी संधी दिली आहे त्या भुमिकेने आपण काम करत राहावे असे सांगत त्यांनी राणेंना टोला लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -