घरताज्या घडामोडीआदित्य ठाकरेंनी नाशिकमधील लोखंडी पुलाची केली पाहणी, पेयजल योजनेचं उदघाटन

आदित्य ठाकरेंनी नाशिकमधील लोखंडी पुलाची केली पाहणी, पेयजल योजनेचं उदघाटन

Subscribe

लोकांच्या अडचणी सोडवणं आमच काम आहे. योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा भेटेल याविषयीसुद्धा चर्चा आदित्य ठाकरेंनी केली आहे.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी नाशिकमधील खरशेतवाडी गावातील लोखंडी पुलाची पाहणी केली आहे. नाशिकमधील आदिवासी पाड्यातील शेंद्रीपाडा गावातील विकास कामांचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शेंद्रीपाड्यातील महिलांची पिण्याचे पाणी नेताना होणारी कसरत समोर आल्यानंतर राज्य सरकारने दखल घेत ओढ्यावर लोखंडी पुल उभारण्यात आला आहे. या पुलाची पाहणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. यावेळी कृषीमंत्री दादाजी भुसे उपस्थित होते.

शिवसेना नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत. नाशिक दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी अनेक विकास कामांचे उद्घाटन केलं आहे. शेंद्रीपाडा येथे उभारण्यात आलेल्या पुलाची पाहणी करत अदित्य ठाकरे यांनी पुलावरुन चालून पाहिले. तसेच गावातील पेयजल योजनेचाही त्यांनी आढावा घेतला आहे.

- Advertisement -

मंत्री आदित्य ठाकरे यांनी गावातील महिलांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी आणि क्षेत्रातील अनेक समस्यांची माहिती घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील लोक पुल नसल्यामुळे लाकडाच्या आधारे ओढा पार करत होते. या जागी आता लोखंडी पुल बनवण्यात आले आहे. पेयजल योजनेचे उद्घाटन करण्यात आल्यावर महिलांनी आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, सोशल मीडियावर नाशिकमधील एका गावातील महिलांचे फोटो व्हायल झाले होते. या फोटोची दखल घेऊन अधिकाऱ्यांना तातडीने समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले होते. प्रशासनाने आता तेथे एक लोखंडी पुल बनवला आहे. पुढील ३ महिन्यात गावातील प्रत्येक घरी पाणी पोहचवण्याची व्यवस्था करण्यात येईल असे आदित्य ठाकरे म्हणाले. लोकांच्या अडचणी सोडवणं आमच काम आहे. योजनांचा लाभ गावातील लोकांना कसा भेटेल याविषयीसुद्धा चर्चा आदित्य ठाकरेंनी केली आहे.


हेही वाचा : सत्ता आघाडीच्या डोक्यात गेल्याने हम करे सो कायदा सुरु आहे, चंद्रकांत पाटलांची ठाकरे सरकारवर टीका

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -