‘टीबी’मुक्त नाशिकसाठी प्रशासन सरसावले; जोरदार कामाला सुरवात

संग्रहित छायाचित्र

नाशिक : जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण मोहिमेअंतर्गत 21 मार्च पावेतो जिल्ह्यात सक्रिय क्षयरोग शोध मोहीम राबवली जात आहे. आरोग्य कर्मचारी आशा स्वयंसेविका घरोघरी जाऊन हे सर्वेक्षण करीत असून नागरिकांनी आजाराची माहिती न लपवता ती सर्वेक्षणासाठी येणार्‍या कर्मचार्‍यांना द्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी गंगाधरन डी. व मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. आशिमा मित्तल यांनी केले

आरोग्य विभागाच्या राबविण्यात येणार्‍या या विशेष मोहिमेत ग्रामीण शहरी भागातील अति जोखमीच्या घरांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. यासाठी जिल्ह्यातील 112 प्राथमिक आरोग्य केंद्र व 592 उपकेंद्र येथून सर्वेक्षण पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. या मोहिमेचे सह नियंत्रण तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी करणार आहेत. या मोहिमेत 4 लाख ५९ हजार ४९२ नागरिकांचे घरोघर जाऊन सर्वेक्षण करण्याचे नियोजन करण्यात आल्याचे डॉ रवींद्र चौधरी जिल्हा क्षयरोग अधिकारी यांनी सांगितले.

क्षयरोग हा बरा होणारा रोग आहे, दोन आठवड्यापेक्षा सतत ताप व खोकला असेल तर दोन वेळा थुंकी तपासून घ्यावी. नियमित औषधोपचार व संपूर्ण कालावधीचा सहा ते आठ महिने औषधी घेणे अत्यंत गरजेचे आहे आजाराचे निदान झाले तर त्यांना डॉट्स औषधी सुरू केली जाणार आहे. विविध कार्यक्रमाचे आयोजन 24 मार्च या जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्ह्यात क्षयरोग जनजागृती रॅली रांगोळी स्पर्धा निबंध स्पर्धा साहित्य अली आरोग्य क्षयरोग जनजागृती पथनाट्य विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणीव जागृती निर्माण केली जाणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी माहिती दिली.

क्षयरोगाची लक्षणे

सर्वेक्षणात दोन आठवड्यांपेक्षा अधिक खोकला असणे दोन आठवड्यापासून येणारा ताप वजनात घट भूक न लागणे मानेवर व इतरत्र गाठी येणे यास इतर लक्षणाची माहिती घेतली जाणार आहे, ज्यांना ही लक्षणे आढळतील त्यांच्या थुंकीचे नमुने तपासणी केली जाणार आहेत

टीबी मुक्त भारत अभियानाअंतर्गत उपचारावर असणार्‍या व पोषण आहार कीट घेण्यासाठी संमती तर असलेल्या शहर रुग्णांना पोषण आहाराच्या किडचे वाटप केले जाणार आहे सर्वेक्षणादरम्यान नागरिकांनी आवश्यक ती माहिती अशांसह आरोग्य कर्मचार्‍यांना द्यावी : डॉ. हर्षल नेहते, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक