घरमहाराष्ट्रनाशिकदेवळा तालुक्यातील महालपाटणे ते पाटरस्ता अखेर पूर्ण

देवळा तालुक्यातील महालपाटणे ते पाटरस्ता अखेर पूर्ण

Subscribe

२० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रस्ता झाला मोकळा

देवळा : तालुक्यातील महालपाटणे ते पाटरस्त्याचे बहुप्रतिक्षित काम अखेर पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांसह वाहनचालकांचा मनस्ताप कमी झाला आहे. शेकडो शेतकर्‍यांना खराब रस्त्यामुळे प्रचंड त्रास होत होता. महालपाटणे गावाशेजारून महालपाटणे-निंबोळा रस्त्यालगत गंगावाडी, बजरंगवाडी आणि पाट परिसरात जाण्यासाठी एक छोटीशी पांदी होती. परंतु, हा रस्ता एका खासगी शेतातून जात होता.

ज्या शेतकर्‍याचे शेत होते त्याने हरकत घेतल्याने येणार्‍या-जाणार्‍यांची मोठी पंचाईत झाली. गावात येण्यासाठी हाच एक महत्वाचा रस्ता असल्याने शेतकर्‍यांना त्रास होत होता. मात्र, यावर कायमस्वरूपी तोडगा निघत नव्हता. अखेर ग्रामपंचायत सदस्य योगेश आहिरे यांनी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दादाजी आहिरे व भाजप जिल्हाध्यक्ष केदा आहेर यांच्या माध्यमातून हा प्रश्न यशस्वीरित्या हाताळला. जमीन मालक तुषार कुलकर्णी यांची मनधरणी करत गावासाठी रस्ता देण्याचे आवाहन केले. कुलकर्णी यांनी वरिष्ठांच्या शब्दाला मान देत गावासाठी रस्ता मोकळा करून दिला आणि २१ जानेवारीला महालपाटणे ते पाट हा चार किमीचा रस्ता डांबरीकरण होऊन पूर्ण झाला.

- Advertisement -

या कामासाठी पंचायत समिती सदस्या सुरेखा निकम, सरपंच सुमन आहिरे, सदस्य तुषार कुलकर्णी, किरण आहिरे, योगेश आहिरे, सुरेखा ठाकरे, गणेश बच्छाव आदींसह अरुण आहिरे, दिलीप आहिरे, सागर खरोले, वसंत भाटेवाल, शंकर झाल्टे, भगवंत आहिरे, सुपडू आहिरे, भाऊसाहेब ठाकरे, बाळासाहेब खरोले, नाना आहिरे, संदीप सोनजे, अशोक आहिरे, सुभाष ठाकरे, उत्तम बच्छाव आदींनी परिश्रम घेतले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -