घरताज्या घडामोडीमुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या आयटी कंपन्या ‘रेडझोन’मध्ये

मुंबई, पुण्यानंतर नाशिकच्या आयटी कंपन्या ‘रेडझोन’मध्ये

Subscribe

लॉकडाऊन संपण्यापर्यंत कर्मचार्‍यांना ‘वर्क फ्रॉम होम’चे आदेश

नाशिक : करोनाच्या पार्श्वभूमीवर माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठ्या कंपन्याही लॉकडाऊन झाल्या आहेत. आयटी कंपन्याचे ‘हब’ असलेल्या मुंबई, पुण्यानंतर आता नाशिकही रेडझोनमध्ये गेल्यामुळे येथील कंपन्यांना काम सुरु करता येणार नाही. तसेच लॉकडाऊन संपल्यानंतर नेमके किती कर्मचारी उपस्थित राहतील याविषयी सध्या काहीच सांगता येणार नाही. मात्र, लॉकडाऊन उघडल्यानंतर आयटी कंपन्या जोमाने सुरु होतील, असा विश्वास पुण्याचे प्रसिध्द आयटी व्यावसायिक तथा हर्बिंजर ग्रुपचे अध्यक्ष डॉ. विकास जोशी यांनी व्यक्त केला आहे.
नाशिक आयटी असोसिएशन (नीटा) तर्फे आयटी व्यावसाय धारकांसाठी वेबिनारचे आयोजन केले होते. यावेळी डॉ. जोशी म्हणाले, की लॉकडाऊन परिस्थितीत व्यवसाय अतिशय संथ गतीने चालत आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर उद्योगात पुढे जाण्यासाठी यामुळे खरोखरच मदत करेल. देशांतर्गत आयटी कंपन्यांसाठी प्रगतशील परिस्थिती, आउटसोर्सिंगमधील आंतरराष्ट्रीय परिदृष्टी आणि कोविडनंतरच्या जगातील विकासास मदत करण्यासाठी देशातील राजकीय टिप्स यासारख्या विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले. नाशिकच्या आयटी कंपन्या सध्या लॉकडाऊन झाल्या आहेत. अशा परिस्थितीत किती कर्मचारी कायम राहतील याविषयी सध्या काहिच सांगता येणार नाही. परंतु, पुणे, मुंबई यांसारखी परिस्थिती नाशिक शहराची नाही. त्यामुळे या शहरांचे काम नाशिकच्या कंपन्या सुरु करु शकतील, असा विश्वास डॉ.जोशी यांनी व्यक्त केला. यावेळी ‘नीटा’च्या एल्युमिनस टेक्नोलॉजीजने हृषिकेश वाकडकर यांनी वेबिनारचे आयोजन केले होते. नेटविनचे अरविंद महापात्रा यांनी प्रश्नोत्तरांच्या सत्राचे समन्वय केले. ‘डब्लूएनएस’चे अरविंद कुलकर्णी, रिलायबल ऑटोटेकचे संस्थापक राजेंद्र बागवे यांसह ‘नीटा’चे 70 पेक्षा अधिक सदस्य वेबिनारमध्ये सहभागी झाले.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -