घरमहाराष्ट्रनाशिकअंबड पोलीस स्टेशनबाहेर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचं आंदोलन

अंबड पोलीस स्टेशनबाहेर भाजप पदाधिकारी, लोकप्रतिनिधींचं आंदोलन

Subscribe

महिलेवर बलात्काराच्या घटनेनंतर आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी

चाकूचा धाक दाखवत एका महिलेवर बलात्कार झाल्याची घटना नवीन नाशिकमध्ये घडली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजप लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी अंबड पोलिस स्टेशनसमोर आंदोलन करत आरोपीला तातडीने अटकेची मागणी केली. दरम्यान, आंदोलनावरुन पोलीस अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांच्यात वाद पेटला होता. अखेर अखेर वरिष्ठांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला.

खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या व सध्या पॅरोलवर बाहेर आलेल्या गुन्हेगाराने नवीन नाशिकमध्ये २७ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेतील आरोपी फरार असून, परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. या पार्श्वभूमीवर आमदार सीमा हिरे, नगरसेविका अलका आहिरे, प्रतिभा पवार, छाया देवांग, जगन पाटील यांच्यासह पदाधिकारी व स्थानिक नागरिकांनी अंबड पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं. यावेळी त्यांनी आरोपीला तातडीने अटक करण्याची मागणी केली.

- Advertisement -

पोलीस-आंदोलकांत संघर्ष

पोलीस स्टेशनबाहेर लोकप्रतिनिधी आणि भाजप पदाधिकारी आंदोलनाच्या तयारीत असल्याचं लक्षात येताच अंबड पोलीस स्टेशनमधील एका अधिकाऱ्याने थेट जमावबंदीचे कलम लावण्याचा इशारा दिला, अशी तक्रार आमदार सीमा हिरे यांनी केली. त्या अधिकाऱ्याच्या भूमिकेमुळे वाद पेटल्याचं लक्षात येताच शेवटी पोलीस उपायुक्त विजय खरात यांनी धाव घेत आंदोलकांची भूमिका समजून घेतली. त्यानंतर वादावर पडदा पडला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -