घरताज्या घडामोडी..तर अंधारात करू बाप्पांची स्थापना, गणेश मंडळांचा पालिकेला इशारा

..तर अंधारात करू बाप्पांची स्थापना, गणेश मंडळांचा पालिकेला इशारा

Subscribe

गणेशोत्सव मंडळांकडून मंडप शुल्कमाफीची मागणी, गुरुवारी महापौर निवासस्थानासमोर आंदोलन

कोरोनामुळे निर्माण झालेल्या आर्थिक टंचाईमुळे गणेश मंडळांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहेत. त्यामुळे यंदाही महापालिका प्रशासनाकडून आकारण्यात येणारे मंडप शुल्क माफ करण्याची मागणी नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने केली आहे. मात्र, शुल्क भरल्याशिवाय महावितरणने वीज कनेक्शन देऊ नये, असे पत्र पालिकेने महावितरणला दिल्याने गणेशोत्सव महामंडळाने गुरुवारी (दि.९) महापौरांच्या रामायण निवासस्थानासमोर आंदोलन आणि वीज न मिळाल्यास अंधारातच बाप्पांची स्थापना करण्याचा इशारा दिला आहे.

कोरोना संकटामुळे नियमांचे पालन करत गणेशोत्सव साजरा करण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी हा उत्सव नियमांचे पालन करत साजरा करण्याचा निर्धार गणेश मंडळाकडून घेण्यात आला आहे. मात्र, गेल्या दीड वर्षांपासून निर्माण झालेल्या आर्थिक संकटामुळे या गणेश मंडळाना देणगी आणि वर्गणी गोळा करणे कठीण होत आहे. परिणामी गणेशोत्सव साजरा करण्याकरिता मोठ्या प्रमाणात निधीची कमतरता भासत आहे.

- Advertisement -

अशा परिस्थितीत पालिका प्रशासनाकडून उभारण्यात येणार्‍या मंडपाची मोजणी करून कर आकारणी करण्यात येते. त्यामुळे यंदा कोरोनाचे संकट पाहता प्रशासनाकडून ही आकारणी माफ करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतू पालिका निर्णयावर ठाम असून गणशोत्सव मंडळांनी याविरोधात रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू पालिकेची ना हरकत असल्याशिवाय वीज कनेक्शन देऊ नये, असे पत्र महापालिकेने महावितरणला दिल्याने, आम्ही अंधारात बाप्पांची स्थापना करू असा इशाराचा महामंडळाने दिला आहे.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -