घर उत्तर महाराष्ट्र मराठा समाजाकडून आंदोलन सुरूच; नांदगावला रास्तारोकोसह 'मुंडन' आंदोलन

मराठा समाजाकडून आंदोलन सुरूच; नांदगावला रास्तारोकोसह ‘मुंडन’ आंदोलन

Subscribe

नाशिक : जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी लोकशाही मार्गाने आंदोलनास बसलेल्या मराठा समाज कार्यकर्त्यांना पोलीसानी जो अमानुष लाठीचार्ज करून अनेक निष्पाप कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहे. त्या निषेधार्थ नांदगाव येथील हुतात्मा चौकात सकल मराठा समाजाच्या वतीने गुरुवारी (दि. ७) सदर घटनेचा तिव्र निषेध व्यक्त करीत रस्तारोको आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी आंदोलकांतर्फे तहसीलदार सिध्दार्थ मोरे व पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना निवेदन देण्यात आले.

आज सकाळी ११ वाजता येथील हुतात्मा चौकात सकल मराठा समाज जालना जिल्ह्यात घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त करून रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झाले. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, तुमचे आमचे नाते काय जय जिजाऊ – जय शिवराय, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे, जरांगे पाटील आगे बढो हम तुम्हारे साथ है या घोषणा देवून परिसर दणाणून गेला होता. यावेळी संभाजीनगर – येवला- मनमाड- मालेगावकडे जाणार्‍या-येणार्‍या वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

- Advertisement -

यावेळी आमदार सुहास कांदे यांनी आपण मराठा समाजाबरोबर सदैव असून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून अशी आपली प्रामाणिक व इच्छा मागणी आहे. तर माजी आमदार संजय पवार यांनी सांगितले कि, न्याय हक्कासाठी उपोषण बघता या पूर्वी सराठा समाजाचे निघालेले शांतता पूर्ण मोर्चे शासन ज्ञात आहे. आरक्षण लढ्यासाठी मराठा समाजाला नांदगाव शहरातील सर्व पक्ष, संघटना यांनी दिलेला पाठिंबा राज्यातील प्रत्येक राजकारण्यांनी, समाजिक संघटनांनी पाठिंबा द्यावा, असे मत व्यक्त करीत मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा लक्षात घेवून शासनाने मराठा समाजाला त्वरित आरक्षण द्यावे असे माजी आमदार पवार यांनी सांगितले.

यावेळी संतोष गुप्ता, महेंद्र बोरसे, राजाभाऊ जगताप, लकी कदम, विशाल वडघुले, निलेश चव्हाण आदिंनी आपले मनोगत व्यक्त करीत मराठा समाजाला आरक्षण मिळावे, अशी एकमुखी मागणी यावेळी त्यांनी केली. याप्रसंगी तहसीलदार मोरे व पोलीस निरीक्षक चौधरी यांना सकल मराठा समाजाच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी झालेल्या रास्ता रोको आंदोलनाप्रसंगी वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. याप्रसंगी सकल मराठा समाजाच्या तरूणांनी भगवे उपरणे व भगव्या टोप्यांवर लिहिलेला ’ एक मराठा लाख मराठा ’ सर्वांचे लक्ष वेधून घेत होते.

- Advertisement -

याप्रसंगी पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांनी पोलीस बंदोबस्त चोख ठेवला होता. यावेळी माजी आमदार अ‍ॅड. अनिल आहेर, माजी आमदार राजेंद्र देशमुख, नगराध्यक्ष राजेश कवडे, किरण देवरे, रमेश बोरसे, फरहान खान, विलास आहेर, तेजदादा कवडे, संगिता सोनवणे, विजय पाटिल, गुलाब चव्हाण, सागर हिरे, दिपक म्हस्के, सुरज पवार, दर्शन आहेर, अनंत आहेर, महेंद्र जाधव, राहूल पवार, राहूल शेवाळे, कमलेश पेहरे, महेंद्र शिरसाठ आदिंसह सकल मराठा समाजातील नागरिक, तरूण उपस्थित होते. यावेळी काही तरूणांनी जालना येथील घटनेचा निषेध म्हणुन मुंडणही केले.

- Advertisment -