घरमहाराष्ट्रनाशिककृषी अधिकार्‍यांनी केला ५० कोटींचा घोटाळा

कृषी अधिकार्‍यांनी केला ५० कोटींचा घोटाळा

Subscribe

पेठ तालुक्यात १४७ शेतकर्‍यांची केली फसवणूक; १६ जणांवर गुन्हे दाखल

नाशिक : कृषी विभागाच्या सुमारे १६ अधिकार्‍यांनी योजना मंजूर करुन घेत बनावट निविदांव्दारे सुमारे १४७ शेतकर्‍यांना गंडवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अधिकार्‍यांनी २०११ ते २०१७ या सहा वर्षांमध्ये सुमारे शासनाची ५० कोटी ७२ लाख ७२ हजार ६४ रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी एका कंत्राटदार शेतकर्‍याने न्यायालयात धाव घेतली आहे. त्यानुसार न्यायालयाने पेठ तालुका पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. गुन्ह्याची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर असल्याने तपास नाशिक ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, पेठ तालुक्यातील हेदपाड-एकदरे येथील शेतकरी योगेंद्र ऊर्फ योगेश सापटे यांनी कृषी अधिकार्‍यांकडे शेतीसंदर्भातील कामे मिळण्याबाबत अर्ज केला होता. त्यांच्याकडून निविदा भरुन घेऊन शंभर रुपयांच्या कोर्‍या स्टॅम्प पेपरवर, तिकेट लावलेल्या कोर्‍या ५० पावत्यांवर व कोर्‍या धनादेशावर स्वाक्षरी घेण्यात आली. त्याव्दारे बनावट दस्ताऐवज नोंदी करत तक्रारदार योगेश सापटे यांणा शेतीसंदर्भातील ट्रॅक्टरची कामे देण्यात आली.

- Advertisement -

मात्र, २०११ ते २०१७ या कालावधीत सापटे यांच्या नावाने परस्पर ३ कोटी १७ लाख ४ हजार ५०४ रुपये घेण्यात आले. त्याचप्रमाणे सहा वर्षांच्या कालावधीत पेठ तालुक्यासाठी मंजूर योजनांचे सुमारे ५० कोटी ७२ ६४ रुपये व इतर १४७ शेतकर्‍यांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी योगेश सापटे यांनी पेठ न्यायालयात बुधवारी (दि.५) अर्ज दाखल केला. मिळालेल्या कामांपैकी ३ कोटी १७ लाख ४ हजार ५०४ रुपये अधिकार्‍यांनी परस्पर काढून घेतल्याची कागदपत्रे न्यायालयात सादर केले आहेत. कृषी अधिकारी व अन्य सहकार्‍यांनी केलेल्या फसवणुकीची चौकशी करावी, अशी मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने पोलिसांना चौकशीचे आदेश दिले आहेत. पुढील तपास पेठचे सहायक पोलीस निरीक्षक संदीप वसावे करत आहेत.

गुन्हा दाखल झालेले अधिकारी
कृषी सहायक : नरेश शांताराम पवार (वय 50, रा.दोडाईचा ता.शिंदखेडा जि.धुळे, दगडु धारु पाटील (वय 55, रा. कहांडोळ ता.शहादा जि.नंदुरबार), संजय शामराव पाटील (वय 46, रा. धुळे), विठ्ठल उत्तम रंधे (वय 34, रा. एरंडगांव ता. येवला जि.नाशिक), दीपक पिराजी कुसळकर (वय 29, रा. अहमदनगर), दिलीप ज्ञानदेव फुलपगार (वय 35, रा. आंबाळे ता. शिरुर जि.पुणे). कृषी सहायक : प्रतिभा यादवराव माघाडे (वय 34, रा. दिंडोरी ता. दिंडोरी जि.नाशिक), राधा चिंतामण सहारे (वय 34, रा. कुकडणे ता. सुरगाणा जि.नाशिक). मंडळ कृषी अधिकारी: विश्वनाथ बाजीराव पाटील (वय 48, रा. परधाडे ता. पाचोरा जि.जळगाव), अशोक नारायण घरटे (वय 50, रा. सांगुडे ता. साक्री जि.धुळे), कृषी अधिकारी- एम.बी.महाजन (वय 33, रा. पेठ). तालुका कृषी अधिकारी : सरदारसिंग उमेदसिंग राजपूत (वय 48, रा. चाळीसगांव ता. पाचोरा जि.जळगाव), शिलानाथ जगनाथ पवार (वय 42, रा. मानूर, ता. कळवण, जि.नाशिक).

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -