घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रनाशकात ११० एकरात आयटी पार्कसह अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्क : उद्योगमंत्री उदय सामंत

नाशकात ११० एकरात आयटी पार्कसह अ‍ॅग्रो इंडस्ट्रियल पार्क : उद्योगमंत्री उदय सामंत

Subscribe

नाशिक : जिल्ह्यात १०० एकरात आयटी क्षेत्र उभारण्यासाठी प्रयत्नपूर्वक नियोजन करावे. त्याचप्रमाणे कृषीपूरक व्यवसाय व प्रक्रिया उद्योग विकसित करण्यासाठी शासनामार्फत सर्वतोपरी मदत केली जाईल. तसेच, जिल्ह्यात डाटा सेंटरचा मोठा प्रकल्प लवकरच उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाहीदेखील उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली.

अंबड रिक्रीएशन सेंटर येथे अंबड इंडस्ट्रिज अँड मॅन्युफॅक्चर्स असोसिएशन (आयमा) व सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित आढावा बैठकीत मंत्री सामंत बोलत होते. यावेळी बंदरे व खनिकर्म मंत्री तथा पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, एमआयडीसीचे मुख्य व्यवस्थापक नितीन गवळी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक संदीप पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, आयमाचे अध्यक्ष निखिल पांचाळ, मुख्य समन्वयक धनंजय बेळे, सल्लागार समिती ज्ञानेश्वर गोपाळे, सरचिटणीस ललित बूब यांच्यासह विविध उद्योग संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

- Advertisement -

उद्योगमंत्री सामंत म्हणाले की, अशी ग्वाहीदेखील उद्योगमंत्री सामंत यांनी यावेळी दिली. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी पाणी, वीज व रस्ते यांसारख्या मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर दिला जाईल. त्यासाठी दर महिन्याला जिल्हाधिकारी व महापालिकेने उद्योजकांच्या बैठका घ्याव्यात. जेणेकरुन जिल्ह्यातील उद्योजकांना येणार्‍या समस्या सोडविण्यासाठी मदत होईल. एमआयडीसीमधील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी अमृत-2 या योजनेतून उपाययोजना कराव्यात. घरपट्टीत झालेल्या वाढीबाबत महापालिकेने योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचनाही सामंत यांनी केल्या. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉअरमध्ये जिल्ह्याचा सहभाग करावा. तसेच, बंद पडलेले उद्योग पुन्हा सुरू होण्यासाठी शासन पातळीवरुन निर्णय घ्यावा, आयटी उद्योजकांसाठी प्रोत्साहनपर योजना सुरू करावी. इलेक्ट्रिक मॅन्युफॅक्टरिंग क्लस्टर उभारावे, अशी मागणी खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केली. कार्यक्रमाच्या प्रारंभी आयमाच्या डिरेक्टरीचे प्रकाशन करण्यात आले. आमदार सीमा हिरे यांनी औद्योगिक क्षेत्रात येणार्‍या समस्यांचे निराकरण करण्यात करण्याची मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -