घरमहाराष्ट्रनाशिककचऱ्यातील अर्भकाला अहिरे कुटुंबाने दिले जीवदान

कचऱ्यातील अर्भकाला अहिरे कुटुंबाने दिले जीवदान

Subscribe

प्रसंगावधान राखत प्राथमिक सुश्रुषेनंतर केले सिव्हिलमध्ये दाखल

सातपूरमधील श्रमिकनगर परिसरात शुक्रवारी (ता.१७) सकाळी ८ ला श्रीकृष्ण अहिरे यांना बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेथे त्यांना पुरुष जातीचे अर्भक दिसले. त्यांनतर श्रीकृष्ण अहिरे यांनी कसलाही विचार न करता रक्कबंबाळ बाळाला पिशवीतून बाहेर काढले. बाळाला घरी आणत कपड्याने त्याच्या अंगावरील रक्त पुसले. त्याला आंघोळ घालून स्वच्छ कपडा मिळवत, तो बाळाला गुंडाळला आणि जिल्हा रुग्णालयात दाखल केले. अहिरे कुंटुंबियांमुळे बाळाला जीवदान मिळाले आहे. ‘आपलं महानगर’ने अहिरे कुटुंबियांशी संपर्क साधत त्यांच्या कार्याला सॅल्यूट केलाच; शिवाय या बिकट परिस्थितीत कुटुंबियांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाची ‘आखो देखी’ जाणून घेतली.

सातपूरमधील श्रमिकनगरमध्ये श्रीकृष्ण रोहिदास आहिरे राहतात. ते नेहमीप्रमाणे सकाळी ८ ला सार्वजनिक शौचालयाजवळ आले. तेथे त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली. तेथे त्यांना पुरुष जातीचे अर्भक दिसले. एका लाल नायलॉन पिशवीच्या आतमध्ये प्लॅस्टिक पिशवीत ठेवलेल्या बाळाला त्यांनी बाहेर काढले. त्यांनी तत्काळ कुटुंबियांशी संपर्क साधत बाळाला घरी आणले. पत्नी अलका अहिरे, शालक चिंतामण अहिरे, अनिता अहिरे व सासरे रामदास अहिरे यांच्या मदतीने बाळाला आंघोळ घाळत बाळाला स्वच्छ कपडा गुंडाळला. त्यानंतर सातपूर पोलिसांशी संपर्क साधत अर्भक सापडल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत घटनास्थळी भेट दिली. अहिरे कुंटुंबीय आणि पोलिसांनी बाळाला उपचार मिळावेत, यासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले.

- Advertisement -

विशेष शिशू अतिदक्षता विभागात (एसएनसीयू) बाळावर प्राथमिक उपचार करत दाखल करून घेण्यात आले आहे. त्यानंतर कागदपत्रांच्या पूर्ततेचं काम सुरू झाले. त्या नवजात शिशूच्या आईचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अहिरे कुंटुंबियांच्या सतर्कतेमुळे एका बाळाला जीवदान मिळाले असून रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांनीही अहिरे कुटुंबियांचे कौतुक केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -