घरमहाराष्ट्रनाशिकपाच दिवसांत हवेचे प्रदूषण तिप्पट

पाच दिवसांत हवेचे प्रदूषण तिप्पट

Subscribe

नाशिक : केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार दिवाळीआधी हवेच्या गुणवत्तेचा ४६ असलेला निर्देशांक लक्ष्मीपूजनानंतर मंगळवारी (दि.२५) सकाळी तब्बल १४३ पर्यंत गेल्याचा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणात तिप्पट वाढ झाल्याचे दिसून आले आहे. शुक्रवारी (दि.२१) २९ असलेला हवेतील सूक्ष्म धूलिकणांचा निर्देशांक आता ११७ पर्यंत पोहोचला आहे. गंभीर बाब म्हणजे गत तीन वर्षांच्या तुलनेत दहा निर्देशांकांनी यंदा हवेच्या प्रदूषणाने ‘मध्यम स्तर’ गाठला आहे.

केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे नाशिक शहरात पाच ठिकाणी दिवाळीत प्रदूषणासह फटाक्यांचा ध्वनी मोजला जातो. सलग तीन-चार वर्षांत राज्यातील इतर शहरांच्या तुलनेत नाशिकचे ध्वनीप्रदूषण आटोक्यात असल्याच्या नोंद करण्यात आली आहे. नाशिकची हवा शुद्ध असल्याच्या नोंदी होत असली दिवाळीत प्रदूषणात वाढ झाली आहे. २०१९ च्या दिवाळीत हवेचा गुणवत्ता निर्देशांक ११० होता. २०२० मध्ये १३० व २०२१ मध्ये १३०-१४० पर्यंत नोंदवण्यात आला. २०२२ मध्ये लक्ष्मीपूजनानिमित्त फटाक्यांची मोठ्या प्रमाणावर आतषबाजी करण्यात आल्याने हवेतील प्रदूषण वाढ झाली आहे.

- Advertisement -

या ठिकाणी आहेत मापन यंत्र
एसआरओ ऑफिस, उद्योग भवन, नाशिक, केटीएच कॉलेज, एमआयडीसी सातपूर, आरटीओ कॉलनी(गोल्फ क्लब), एनएमसी बिल्डींग, नाशिक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -