सुरगाणा तालुक्यातील अलंगुण बंधारा फुटला, गावात शिरल पाणी

नाशिक : राज्यात पावसानं थैमान घातलंय. नाशिकमध्येही जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यातच नागरिकांची मोठी तारांबळ उडाली आहे. सुरगाणा तालुक्यातील अलंगुण बंधारा फुटला. त्यामुळे अलंगुण गावातील शेकडो घरा पाण्याखाली गेली आहेत.

सुरगाणा परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सध्या या भागात लोकांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी बंधार्‍याची उंची वाढवल्याने दुर्घटना झाली असल्याचा आरोप स्थानिक करत आहेत. नागरिकांनी वेळीच तिथून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केले. त्यामुळे जीवितहानी टळली आहे. मात्र संपूर्ण गावात पाणी शिरलं आहे. त्यामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले तर काही घरे वाहून गेली आहेत. काही जनावरे या पाण्यात वाहून गेली असल्याची भिती व्यक्त केली जात आहे. पावसाळ्यापूर्वीच बंधार्‍याची उंची वाढवल्याने दुर्घटना घडली असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. नागरिकांनी वेळीच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर केल्यामुळे जीवितहानी टळली. मात्र संपूर्ण गावात पाणी शिरले आहे.