घरताज्या घडामोडीशहरातील रस्त्यांवर खासगी वाहनांना बंदी

शहरातील रस्त्यांवर खासगी वाहनांना बंदी

Subscribe

करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी मनाई केली आहे. सोमवार (दि.२३) सायंकाळी 5 वाजेपासून ते 31 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत बंदी आदेश लागू राहणार आहेत.
करोना आजार संसर्गजन्य असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव तातडीची प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी नाशिक शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना वाहतुकीस पोलीस आयुक्तांनी मनाई केली आहे. रहिवासी, अभ्यागत व वारंवार कामानिमित्त शहरात येणाऱ्याना ही बंदी असणार आहे.

शहरातील कोणत्याही रस्त्यांवर व गल्लोगल्ली या ठिकाणी सायकल, दुचाकी, तीनचाकी, कारसह इतर वाहने प्रवास व अवजड वाहतुकीस मनाई असणार आहे. आदेशानुसार खासगी वाहने, रिक्षा, टॅक्सी वाहनांना वाहतुकीस मनाई करण्यात आली आहे.

- Advertisement -

रुग्णालयात जाण्यासाठी परवानगी
अत्यावश्यक प्रसंगी, रुग्ण तपासणी किंवा रुग्णालयात जाण्यासाठी कार, रिक्षा, टॅक्सीसह इतर प्रवासी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, गाडीत चालक आणि दोन व्यक्तींनाच प्रवास करता येणार आहे.

बंदी नसणारी वाहने
बंदी आदेश रुग्णवाहिका, पोलीस वाहने, जीवणावश्यक वस्तू व सेवा वाहतूक करणारी वाहने, डॉक्टर व परामेडिकल कर्मचाऱ्यांना लागू राहणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -