घरताज्या घडामोडी10वी, 12वी व्यतिरीक्त सर्वच विद्यार्थ्यांना निकाल मिळणार ऑनलाईन

10वी, 12वी व्यतिरीक्त सर्वच विद्यार्थ्यांना निकाल मिळणार ऑनलाईन

Subscribe

शिक्षण संचालकांचा आदेश: पहिली ते नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांना लाभ

नाशिक : राज्य सरकारने इयत्ता नववी व अकरावीच्या परीक्षा रद्द केलेल्या असल्या तरी शिक्षकांना प्रथम सत्राच्या आधारे निकाल तयार करण्याचे आदेश दिले होते. त्याआधारे विद्यार्थ्यांना हा निकाल ऑनलाईन देण्याचे आदेश शिक्षण संचालक दिनकर पाटील यांनी दिले आहेत. इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांना एसएमएस, दुरध्वनी किंवा व्हॉट्सअपच्या माध्यमातून निकाल बघायला मिळणार आहे. याविषयी दै.आपलं महानगरने दि.22 एप्रिल रोजी सर्वप्रथम वृत्त प्रसिध्द केले होते.
करोनाच्या पार्श्वभूमीवर पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षाही रद्द करण्याची वेळ ओढावली आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून इयत्ता दहावीचा भुगोल या विषयाचा पेपरही रद्द करत राज्य सरकारने बेस्ट ऑफ फाईव्हच्या आधारे निकाल घोषित करण्याची तयारी सुरु केली आहे. मात्र, इयत्ता नववी व अकरावीचा निकाल हा प्रथम सत्रातील गुणांच्या आधारे तयार केला जाणार आहे. इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांची प्रथम सत्रात 60 गुणांची चाचणी परीक्षा घेतली जाते. त्याआधारेच प्रथम सत्राचे निकालपत्रही तयार होते. तसेच दुसर्‍या सत्रात औपचारीकता म्हणून 60 गुणांची घटक चाचणी घेतली जाते. मात्र, या परीक्षेचे गुण ग्राह्य धरण्यात येत नव्हते. यातून फक्त विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती तपासून त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत होता. परंतु, दुसर्‍या सत्रातील घटक चाचणीचेही गुण आता ग्राह्य धरण्यात येणार आहेत. म्हणजेच प्रथम सत्रातील 60 गुणांची पहिली घटक चाचणी आणि दुसर्‍या सत्रातील 60 गुणांची चाचणी अशी एकूण 120 गुणांची सरासरी काढून निकाल 1 मे पर्यंट तयार झाले आहेत. निकाल विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना एसएमएस, दुरध्वनी किंवा व्हॉट्सअप सारख्या प्रणालीचा वापर करण्याचे आदेश शिक्षक संचालक पाटील यांनी दिले आहेत.
&
शाळा व महाविद्यालयांवर जबाबदारी
विद्यार्थ्यांपर्यंत निकाल वेळेत पोहोचल्यास त्यांना पुढील शैक्षणिक वर्षाची तयारी सुरु करणे सोपे जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांपर्यंत निकाल पोहोचवण्याची जबाबदारी शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांवर सोपवण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच विद्यार्थ्यांना आपला वार्षिक निकाल बघायला मिळेल.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -