घरताज्या घडामोडीछोट्या क्लासेसचालकांना शिकवणीची परवानगी द्या

छोट्या क्लासेसचालकांना शिकवणीची परवानगी द्या

Subscribe

कोचिंग क्लासेस संचालक संघटनेची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी

नाशिक : करोनामुळे छोट्या-मोठ्या व्यावसायिकांसोबतच क्लासेसचालकांचेही आर्थिक गणित पुर्णपणे कोलमडले आहे. शासनाने सामाजिक अंतर राखण्याच्या अटींवर दुकानांना परवानगी दिली आहे. त्याच धर्तिवर छोट्या क्लासेस चालकांना इयत्ता 5 वी ते 10वीपर्यंत शिकवण्यास परवानगी देण्याची मागणी कोचिंग क्लासेस संघटनेनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.
प्रायव्हेट कोचिंग क्लासेस डायरेक्टर असोसिएशनच्या वतिने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांना निवेदन देण्यात आले. त्यानुसार लॉकडाऊनमुळे क्लासेसचे भाडे, कर्मचारी, शिक्षकांचे पगार, घरखर्च, कर्जाचे हप्ते आदी बाबींचा खर्च भागवने अवघड झाले आहे. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांकडे बाकी राहिलेली फी व लॉकडाऊनच्या काळात झालेले नुकसान यामुळे अनेक क्लासेसचालक बेजार झाले आहेत. शासनाने सामाजिक अंतर ठेऊन जसे दूकाने, कार्यालये व कारखाने सुरु करण्यास परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे छोट्या व मध्यम क्लासेस संचालकांना 5 ते 10 विद्यार्थ्यांच्या शिकवणी घ्यायला परवानगी द्यावी, या मागणी केली आहे. यावेळी संघटनचे अध्यक्ष जयंत मुळे, उपाध्यक्ष मुकुंद रनाळकर, विजय जोशी, सचिव सीए लोकेश पारख, पदाधिकारी किशोर सपकाळे, फैजल पटेल, पवन जोशी यांसह सचिन जाधव, उदय शिरोडे, दिपक जाधव, मयुर जाधव, दिपक गुप्ता, गणेश कोतकर, सचिन अपसुंदे, अजय शहाणे, युगंधर चौधरी, घनशाम अहिरे, संतोष पवार, अमर भिंडे आदी उपस्थित होते.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -