Eco friendly bappa Competition
घर उत्तर महाराष्ट्र अर्ध्याहून अधिक पावसाळा सरला तरी गोदामाई यंदा एकदाही खळाळून वाहिलीच नाही

अर्ध्याहून अधिक पावसाळा सरला तरी गोदामाई यंदा एकदाही खळाळून वाहिलीच नाही

Subscribe

नाशिक : पावसाचे अडीच महिने उलटूनही नाशिकसह अनेक तालुक्यांमध्ये आजही दमदार पाऊस झाला नसल्याचे चिंताजनक चित्र आहे. दरवर्षी ऑक्टोबरपर्यंत नाशिकची जीवनवाहिनी असलेल्या गोदावरी नदीला निदान दोन-तीन वेळा पूर येतो. यंदा मात्र पावसाच्या पाण्याने गोदावरी एकदाही खळाळून वाहिली नाही. जिल्ह्यातील एकूण २४ प्रकल्पांमध्ये ६५ टक्के पाणीसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत २६ टक्के पाणीसाठा कमी आहे.

गतवर्षी जिल्ह्यातील धरण प्रकल्पांमध्ये १७ ऑगस्टदरम्यान ९१ टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला होता. दरवर्षी जुलैअखेरपर्यंत गोदावरीला किमान एकदा तरी पूर येतो. पूर आला नाही तरी पावसाच्या वाहून येणार्‍या पाण्यामुळे गोदामाई खळाळून वाहते. परंतु, यंदाच्या पावसाळ्यात असे चित्र एकदाही दिसून आलेले नाही. यापूर्वी २०१६ मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे पर्यावरणप्रेमी देवांग जानी यांनी सांगितले. नाशिकला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात ९१ टक्के तर, गंगापूर धरण समूहात ७८ टक्के पाणीसाठा आहे. दारणा धरण ९६ टक्के भरल्याने येथून ५५० क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मुकणे धरणात ७७ टक्के तर, चणकापूर धरण ७५ टक्के भरल्याने येथून १७७ क्युसेक विसर्ग सुरू आहे.

- Advertisement -

गिरणा धरण ३७ टक्केच भरले. जून ते १७ ऑगस्टपर्यंत ३७१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. सरासरी ५९ टक्के एवढा पाऊस झाल्याने शेतीचा विचार करता खरिपाच्या पेरणीचे एकूण क्षेत्र ६ लाख ४१ हजार ७७१ हेक्टर आहे. यंदा पेरणी व लागवडीचे क्षेत्र पाच लाख ८७ हजार ७५१ हेक्टर म्हणजेच एकूण ९१ टक्के आहे. कांदा लागवड ६६२ हेक्टरवर झाली आहे. सिन्नर, येवला, नांदगाव, मालेगावी पावसाचे प्रमाण कमी असल्याने चारा छावण्या सुरू करण्याची मागणी होत आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -