घरताज्या घडामोडीअमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघातात मृत्यू

अमळनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे यांचा अपघातात मृत्यू

Subscribe

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे सुटी निमित्त खासगी गाडीने नाशिक येथे घरी जात होते. मात्र, त्याचदरम्यान वडाळी भोई गावाजवळील रस्त्यालगतच्या खोल भागात त्यांची गाडी कोसळली. या अपघातामध्ये ससाणे यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन त्यांची जागीच मृत्यू झाला. ही घटना आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.

माहितीनुसार अमळनेर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र ससाणे हे नाशिकचे रहिवाशी होते. ते सुटी घेऊन दवाखान्यात नियमित तपासणी करण्यासाठी नाशिकला जात होते. अमळनेरहून ते सकाळी १० वाजेच्या सुमारास निघाले होते. त्यांना मधुमेहाचा त्रास होता. वडाळी भोई गावाजवळ दीड वाजेच्या सुमारास ससाणे यांची गाडी झाडावर जोरात आदळली आणि त्यानंतर झाड तोडून गाडी पुढे जाऊन कोसळली.

- Advertisement -

या घटनेची माहिती मिळताच चांदवड टोल प्लाझावरील कर्मचारी घटनास्थळी हजर झाला. त्यावेळेस त्यांच्या खिशातून ओळखपत्र काढले असता ते पोलीस अधिकारी ससाणे असल्याचे स्पष्ट झाले. या घटनेची माहिती ताबडतोब अमळनेरलाही माहिती कळली. त्यानंतर ससाणे याचा मृतदेह शवविच्छेनासाठी चांदवड येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आला. या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी नायब तहसीलदारासह पत्नीवर गुन्हा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -