घरउत्तर महाराष्ट्रअंबडचे नवे पोलीस ठाणे कधी?; नागरिक ६ तारखेला अंबड ते मंत्रालय मोर्चाच्या...

अंबडचे नवे पोलीस ठाणे कधी?; नागरिक ६ तारखेला अंबड ते मंत्रालय मोर्चाच्या तयारीत

Subscribe

नाशिक : अंबड परिसरात गुन्हेगारीमध्ये वाढ झाली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर अंबड औद्योगिक वसाहतीसाठी नवीन पोलीस ठाण्यासाठी मंगळवार, दि.6 डिसेंबरपासून अंबड ते मंत्रालय अर्धनग्न पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चात नवीन नाशिकमधील नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते रामदास दातीर यांनी केले आहे.

अंबड औद्योगिक वसाहतीसाठी नवीन पोलीस ठाणे होण्यासाठी अनेक प्रशासकीय दरबारी निवेदने दिली. तसेच संपूर्ण परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवून पोलीस आयुक्तांना समस्यांबाबत माहिती देण्यात आली. त्यानंतर दत्तनगर कारगिल चौकात साखळी उपोषण करून पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. दरम्यान, पोलीस आयुक्तांनी पोलीस चौकीसाठी मनुष्यबळ देण्याचे कबूल केले होते. त्यानंतर जागेसाठी महापालिका आयुक्तांना निवेदन देण्यात आले. मात्र, नवीन पोलीस ठाणे अथवा पोलीस चौक्यांबाबत हालचाली दिसून आल्या नाहीत.

- Advertisement -

अंबड औद्योगिक परिसरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत आहे. याप्रकरणी अनेक आंदोलने करण्यात आली. मात्र, पोलीस ठाणे अद्यापपावेतो झालेले नाही. या परिसरात पोलिसांचा धाक नाही. परिणामी, अंबड परिसरातील गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिक दहशतीखाली आहेत. नवीन पोलीस ठाण्याच्या मागणीपूर्वी पोलीस चौक्या दिल्या असत्या तरी गुन्हेगारीच्या घटना घडल्या नसत्या, असे रामदास दातीर यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -