घरताज्या घडामोडीनाशिकमध्ये चार दुचाकीचोरांना अटक, तब्बल २५ दुचाकी हस्तगत

नाशिकमध्ये चार दुचाकीचोरांना अटक, तब्बल २५ दुचाकी हस्तगत

Subscribe

दुचाकींची चोरी करणाऱ्या चोरट्यांच्या टोळीचा अंबड पोलिसांनी केला पर्दाफाश

नवीन नाशिक – शहरासह जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत दुचाकींची चोरी करणाऱ्या टोळीचा अंबड पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल २५ दुचाकी जप्त केल्या.

अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी रात्रगस्तीवर असताना संजीवनगरात तीन व्यक्ती मोटरसायकल लोटत घेऊन जाताना दिसले. पोलिसांना संशय आल्याने त्यांनी तिघांना थांबण्याचा इशारा करताच संशयितांनी फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. सहायक पोलीस निरीक्षक गणेश शिंदे यांनी चौकशी केली असता शहरासह ग्रामीण भागातून मोटरसायकल चोरल्याची कबुली संशयितांनी दिली. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

- Advertisement -

चोरीच्या दुचाकींची ग्रामीण भागात विक्री

चोरलेल्या मोटारसायकल संशयितांनी उमराणा (ता. देवळा), नामपूर (ता. सटाणा) या ठिकाणी विकल्याचे पुढे आले आहे. त्यानंतर पोलिसांनी या दोन्हीही गावांमध्ये जाऊन चोरीच्या मोटरसायकल विकत घेणाऱ्या व्यक्तींना अटक केली. या कारवाईत एकूण ८ लाख २५ हजार रुपये किंमतीच्या २५ मोटारसायकल जप्त केल्या.

या भागांतून सर्वाधिक चोरी

चोरट्यांनी शहरातील अंबड, इंदिरानगर, सातपूर, गंगापूर, उपनगर, सरकारवाडा, मुंबईनाका, म्हसरूळ, भद्रकाली तसेच, ओझर, पिंपळगाव, देवळा या भागांतून सर्वाधिक मोटरसायकल्स लंपास केल्याचे उघडकीस आले आहे. या ठिकाणच्या पोलीस स्टेशन्समध्ये तसे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, या कारवाईत अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुमार चौधरी, सहाय़क पोलीस निरीक्षक गणेश शिंदे, पोलीस कर्मचारी चंद्रकांत गवळी, किरण गायकवाड, कर्मचारी हेमंत आहेर, प्रमोद काशीद, अनिरुध्द येवले, तुळशीराम जाधव, मच्छिंद्र वाघचौरे, योगेश शिरसाठ, जनार्दन ढाकणे, राकेश राऊत, मुकेश गांगुर्डे, नितीन सानप, अनिल गाढवे आदी सहभागी झाले होते.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -