मार्केट यार्डसमोर प्राचीन वडाचे झाड कोसळले

नाशिक : शहरात मागील काही महिन्यातील झाड पडण्याच सत्र सुरूच आहे. दिंडोरी रोड वरील कृषि उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरील प्राचीन वडाचे झाड कोसळले आहे. सुदैवाने यात कोणतीही दुर्घटना झालेली नाही. मात्र काही वाहनांच मोठ नुकसान झाल आहे. ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी त्याठिकाणी मोठी रहदारी असते.

शहरात वारंवार झाड पडण्याच्या घटना घडताय. यात मागील महिन्यात ३ निष्पाप नागरिकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. शहरात मागील काळात गुलमोहरची झाड पडत होती. जी झाड कामजोरच असतात, मात्र आता वडाच झाड पडल्यान आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. खरतर आज कोसळलेल झाड जय ठिकाणी आहे त्याच्या दोन्ही बाजूला डांबरीकरण करण्यात आल आहे. तसेच झाडच्याही बुंदयाजवळही डांबरीकरण करण्यात आल आहे. याबाबत पर्यावरण प्रेमींनी अनेकदा शहरातील ज्या झाडांच्या बुंदयाभोवती डांबरीकरण किंवा कॉक्रिटीकरण केल आहे. ते हटवाव अशी मागणी केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होताना दिसतय. आणि त्यातूनच झाड कमजोर होऊन ती पडत आहेत असे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, बाजार समिति समोर वडाचे झाड पाडल्याच्या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनांच मोठ नुकसान झाल आहे. ११ वाजेच्या दरम्यान याठिकाणी शेतकरी, व्यावसायिक, व्यापारी, हमाल आदींची मोठी वर्दळ असते. त्याच सोबत हा शहरातील मुख्य रास्ता असल्यान वाहनांचीही मोठी ये-जा या रस्त्यावरून असते. मात्र झाड पडते वेळी त्याठिकाणी काहीशी गर्दी कमी असल्यान सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान याठिकाणी उभ्या असलेल्या दोन दुचाकी, एक रिक्षा व हातगाडी यांच मोठ नुकसान झालय.