घरमहाराष्ट्रनाशिकआनंदवली ते चांदशी रस्त्याचे काम ७ दिवसांत सुरू करा, अन्यथा दगड, माती...

आनंदवली ते चांदशी रस्त्याचे काम ७ दिवसांत सुरू करा, अन्यथा दगड, माती भेट देऊ

Subscribe

छत्रपती सेनेचा जिल्हा परिषद सीईओंना इशारा, निकृष्ट दर्जाच्या कामाच्या चौकशीची मागणी

आनंदवली ते चांदशीदरम्यान पुलापासून पुढे चांदशीकडे जाणाऱ्या रस्त्याची खडीकरणानंतर अवघ्या ५ दिवसांत दूरवस्था झाली आणि ती अद्याप कायम आहे. बेकायदेशीर आणि नियमांना फाटा देऊन तयार करण्यात आलेल्या या रस्त्याच्या डांबरीकरणाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याने, या कामाची चौकशी व्हावी, अशी मागणी छत्रपती सेनेने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली आहे. पुढील ७ दिवसांत रस्त्याचे काम सुरू न झाल्यास रस्त्यावरील दगड, माती भेट स्वरुपात देऊ, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

चांदशीकडे जाणाऱ्या पुलापुढील चढाचा रस्ता टेंडर नसताना केवळ केंद्रीय मंत्री नितीन गडकरी येणार म्हणून तातडीने खडीकरण करण्यात आला. या ठिकाणी काँक्रिटीकरण प्रस्तावित होते. मात्र, ते अद्याप का झाले नाही, हे स्पष्ट करावे. त्या पुढील टप्प्यातील रायबा हॉटेल ते बांबू हॉटेल दरम्यानचा ६०० मीटर रस्त्यावर तयार केल्याच्या पाचव्या दिवसापासून खड्डे पडण्यास सरुवात झाली. खडीकरणाच्या कामादरम्यान पथदीपांच्या वायर्स तुटल्या होत्या, त्या आजही जोडल्या गेलेल्या नाहीत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी स्वतः दुचाकीवरून प्रवास करुन हा रस्ता किती जीवघेणा आहे, हे अनुभवावे, असे आवाहनही संघटनेने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून केले आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम ७ दिवसांत सुरू करावे, अन्यथा रस्त्यावरील दगड माती भेट स्वरुपात देऊ, असा इशाराही संघटनेच्या शिष्ट मंडळाने दिला आहे. या वेळी छत्रपती सेनेचे संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार, मार्गदर्शक नीलेश शेलार, कोर टीम अध्यक्ष तुषार गवळी, चांदशीचे जिल्हाध्यक्ष तथा उपसरपंच राहुल पाटील, वसंत पाटील, रोहित पाटील, बळीराम कचरे, पंकज येप्रे, भोला रोकडे, सुनील गायकवाड, दीपक शिरसाठ, नामदेव खारटे, परीक्षित येप्रे , आत्माराम खराटे, भगवान धोंगडे, रोहित आहेर आदी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -