घरमहाराष्ट्रनाशिक...आणि नाशिकमध्ये शिवसैनिकांचा एकच जल्लोष, खासदारांनी मनसोक्त धरला ठेका

…आणि नाशिकमध्ये शिवसैनिकांचा एकच जल्लोष, खासदारांनी मनसोक्त धरला ठेका

Subscribe

नाशिक : बहुप्रतीक्षित असलेला महाराष्ट्राचा सत्तासंघर्षाचा निकाल अखेर सर्वोच्च न्यायालयाने दिलाय. निकालात शिंदे यांच्या सरकारला कुठलाही धोका नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. तसेच, १६ आमदारांच्या आपत्रतेबाबतही निर्णय घ्यायचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडेच ठेवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे शिवसेना शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये एकच जल्लोषाचे वातावरण दिसून आले. नाशिक शहारातही शिवसेना शिंदे गटाकडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

दरम्यान निकाल एकनाथ शिंदे यांच्या बाजूने आल्यानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रभर एकच जल्लोषाचे वातावरण दिसून आले. नाशिक शहरात देखील शिंदेंच्या शिवसेनेच्या मायको सर्कल परिसरातील मध्यवर्ती कार्यालयात शेकडो शिवसैनिकांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला. जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतषबाजी करत, एकमेकांना पेढे भरवत, ढोल ताशाच्या तालावर ताल धरत यावेळी जल्लोष करण्यात आला. तसेच एकनाथ शिंदे आगे बढो, हम तुम्हारे साथ है, शिवसेना जिंदाबाद, बाळासाहेब ठाकरेंचा विजय असो, शिवसेंना-भाजपा युतीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या.

- Advertisement -

यावेळी खासदार हेमंत गोडसे, सह संपर्क प्रमुख राजु अण्णा लवटे, जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते, भाऊलाल तांबडे, अनिल ढिकले, युवासेना विस्तारक योगेश बेलदार उप जिल्हाप्रमुख सुदाम ढेमसे, श्याम साबळे, दिगंबर मोगरे, शिवाजी भोर, प्रमोद लासुरे, महेश जोशी, अमोल सूर्यवंशी, विधानसभा प्रमुख प्रताप मेहरोलिया, बाबुराव आढाव, रोशन शिंदे, सचिन भोसले, आनंद फरताळे, शिवा ताकाटे, योगेश म्हस्के, नगरसेविका सुवर्णाताई मटाले, संगीताताई जाधव, मंदाकिनीताई जाधव, शोभाताई मगर, श्यामलाताई दीक्षित,अस्मिता देशमाने, शोभाताई गटकळ, मंगलाताई भास्कर, महानगर प्रमुख दिगंबर नाडे, उमेश चव्हाण, आदित्य बोरस्ते, आकाश कोकाटे, आदींसह शिवसेना, युवासेना कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -