घरमहाराष्ट्रनाशिकजिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार

जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार

Subscribe

मराठी भाषेतील अ‍ॅप उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणी

जिल्ह्यासह राज्यातील अंगणवाडी कर्मचार्‍यांनी मराठी अ‍ॅप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या यासंदर्भातील निवेदन देण्यात आले.

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत जिल्ह्यात सुमारे ४००० अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामासाठी अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. हे मोबाईल निष्कृष्ट असल्याने शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईलवर हे अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते.

- Advertisement -

जिल्ह्यातील अधिकांश अंगणवाडी सेविका अल्पशिक्षित असल्याने त्यांना इंग्रजीचे पुरेसे ज्ञान नाही. सध्या पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर मुलांचे, महिलांचे नाव इंग्रजीत येत असल्याने ते भरताना अडचणी येतात. अनेक अंगणवाडी सेविकांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतले असल्याने त्यांना मराठी भाषेतील अ‍ॅप उपलब्ध करुन द्यावे, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदन देताना युनियन प्रतिनिधी लता क्षीरसागर, संगीता कासार, जया गरडे उपस्थित होते. महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी संघाचे संघटक सचिव राजेश सिंह यांनी याबाबत माहिती दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -