घरमहाराष्ट्रनाशिकसंतप्त शेतकर्‍यांनी कांदा लिलाव पाडले बंद

संतप्त शेतकर्‍यांनी कांदा लिलाव पाडले बंद

Subscribe

लासलगाव बाजार समितीतून ट्रॅक्टरची चोरी

लासलगाव : बाजार समितीत कांदा लिलावासाठी आलेल्या शेतकर्‍याचा आठ लाखाचा नवाकोरा ट्रॅक्टर चोरीला गेल्याने संतप्त सर्व शेतकर्‍यांनी सुमारे एक तास बाजार समितीचे मुख्य गेट बंद करून कांदा लिलाव बंद पाडल्याची घटना लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत घडली. दरम्यान शिवापूर येथून चोरीला गेलेला ट्रॅक्टर मिळाला आहे.लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतीतून ट्रॅक्टर चोरीला गेल्याची घटना सोमवारी  रात्री घडली. चोरीची घटना लक्षात येताच शेतकर्‍याने बाजार समिती प्रशासनाकडे धाव घेतली.

यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी सकाळी १०.३५ वाजता बाजार आवारात लिलाव बंद पाडले. अखेर दीड तासाने वातावरण निवळल्यानंतर लिलाव पूर्ववत झाले. याबाबत सविस्तर माहिती अशी की, टाकळी विंचूर येथील शेतकरी सुरेश आबाजी काळे यांनी नवा जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर व कांद्याची भरलेली ट्रॉली नवा ट्रॅक्टर सोमवार रोजी छत्रपती शिवाजी महाराज नवीन कांदा बाजार आवारात लावला होता.

- Advertisement -

सकाळी पुन्हा बाजार समितीत आल्यानंतर ट्रॅक्टर दिसून आला नाही.यावर ट्रॅक्टर चोरी गेल्याचे लक्षात आल्यानंतर शेतकर्‍याने बाजार समिती प्रशासनाकडे धाव घेतली.बाजार समितीत बसविलेले सीसीटीव्ही मध्ये याबाबत पाहणी केली असता ट्रॅक्टर बाजार समिती आवारात प्रवेश करताना दिसतो. मात्र बाहेर जाताना दिसून आला नाही.बाजार समिती आवारातून ट्रॅक्टर चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर सकाळी संतप्त शेतकर्‍यांनी सकाळी १०.३० वाजता शेतमाल लिलाव बंद पाडले.आवाराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच गर्दी केली होती. यामुळे काहीसा तणाव निर्माण झाला होता.

जोपर्यंत ट्रॅक्टर सापडत नाही, तोपर्यंत लिलाव सुरू होऊ देणार नाही अशी भूमिका शेतकर्‍यांनी घेतली होती. शेतकर्‍याने गेल्या तीन महिन्यांपूर्वी नवा ट्रॅक्टर खरेदी केला असल्याने तो हताश होऊन रडू लागला. यावेळी घटनास्थळी बाजार समिती सभापती सुवर्णा जगताप,संचालक पंढरीनाथ थोरे, सचिव नरेंद्र वाढवणे, माजी पंचायत समिती सभापती शिवा सुराशे, सदस्य उत्तमराव वाघ, निफाड शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बबन शिंदे आदी यावेळी उपस्थित झाले होते.

- Advertisement -

ट्रॅक्टर शोधून द्यावा किंवा न सापडल्यास नवीन ट्रॅक्टर द्यावा अशी मागणी शेतकर्‍याने बाजार समितीकडे करण्यात आली.बाजार समितीकडून संबंधित शेतकर्‍याची समजूत काढण्यानंतर दीड तासाने पुन्हा लिलाव पूर्ववत झाले. यावेळी मुख्य प्रवेशद्वार बंद केल्याने नव्याने कांदा लिलावासाठी येणारे व लिलाव होऊन बाहेर जाणारे ट्रॅक्टर मार्ग बंद झाल्याने अडकून पडले.लासलगाव-कोटमगाव रोडवर दुतर्फा रांगा लागून वाहतुज खोळंबली होती. त्यातच पालकमंत्री छगन भुजबळ यांचा लासलगाव दौरा असल्याने पोलीस यंत्रणेवर ताण पडला.सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांसह यंत्रणा दाखल होऊन चोख बंदोबस्त दिला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -