नाशिक : शहरात गुन्हेगारीने कळस गाठलेला असतांनाच अंबड लिंक रोडवरील खुनाच्या घटनेने नाशिक शहर हादरले आहे. अंबड लिंकरोडवरील संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेख या 19 वर्षीय तरुणावर नाशिक जिल्हा रुग्णालयातील आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. दरम्यान, मृत मेराजच्या नातेवाईकांनी उपचारात हलगर्जीपणा केल्याचा आरोप केला आहे.
घटनेचे वृत्त समजताच पोलिस आयुक्त अंकुश शिंदेंसह उपायुक्त मोनिका राउत, सहाय्यक आयुक्त शेखर देशमुख, प्रभारी पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे, वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ घटनास्तळी दाखल झाले. याप्रकरणी 4 जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. पेकी 2 जण विधीसंघर्षित बालक आहे
पूर्ववैमनस्यातून हा झाल्याचा संशय; तपास सुरु
मेराज खान हा जवळीलच एका दुकानात केक घेण्यासाठी गेला असता तिथे एका तरुणासोबत त्याचा वाद झाला होता आणि हाच वाद ईतका वाढला की त्यानंतर तरुणाने त्याच्या साथीदारांना घेऊन येत हा हल्ला चढविला. नाशिकच्या अंबड लिंक रोडवर गुरुवारी रात्री 8 च्या सुमारास संजीवनगर परिसरातील शिवनेरी चौकात दहा ते बारा जणांच्या टोळक्याने धारदार शस्त्राने दोन युवकांवर केलेल्या प्राणघातक हल्ल्यात मेराज खान या 18 वर्षीय युवकाचा मृत्यू झाला. तर इब्राईम शेखवर जिल्हा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाल्याचा पोलिसांना प्राथमिक संशय आहे त्यादिशेने तपास सुरु असल्याचे पोलिस आयुक्त शिंदे यांनी सांगितले.
परिसरात तणावाचे वातावरण
विशेष गोष्ट म्हणजे पोलिसांचा निषेध आणि जिल्हा रुग्णालयात उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईका रात्री मयत मेराजला रुग्णवाहिकेतून थेट पोलीस आयुक्त कार्यालयात घेऊन गेले होते. त्यानंतर पोलीस अधिकार्यांनी समजूत घालताच पुन्हा रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालयाकडे वळवण्यात आली. दरम्यान या घटनेनंतर अंबड लिंक रोडसह जिल्हा रुग्णालयाच्या आवारात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण पसरले होते. शीघ्र कृती दलासह चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.