घरमहाराष्ट्रनाशिकआंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र स्पर्धेत नाशिकच्या अनुज शर्माची निवड

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र स्पर्धेत नाशिकच्या अनुज शर्माची निवड

Subscribe

या विद्यार्थिनीच्या यशामुळे नाशिकचे नावलौकिक

आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र स्पर्धेच्या अंतिम फेरीसाठी नाशिकच्या दिल्ली पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी अनुज शर्मा हिची निवड झाली. तिच्या या यशामुळे नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे.

अत्यंत कठीण मानल्या जाणार्‍या या स्पर्धेत आव्हानात्मक अशा मुलभूत आणि संशोधनावर आधारीत प्रश्नांचा समावेश होता. सर्वसमावेशक शिक्षण, अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळेच शाळेचे विद्यार्थी विविध पातळ्यांवर यशाची पताका फडकावत आहेत. त्याचाच भाग म्हणून अनुज शर्मा हिने यशस्वीपणे सहभाग घेत अंतिम फेरीत उल्लेखनीय यश पटकावले. या यशाबद्दल संस्थेचे संचालक सिद्धार्थ राजघरिया, प्राचार्या डॉ. पुष्पी दत्त आणि शिक्षकांनी अनुजचे अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी ऑनलाईन शाळा पद्धत सुरू असतानाही शाळेच्या वतीने विविध उपक्रम आयोजित केले जात आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -