माझ्यामुळे १२ आमदार नियुक्ती रखडली : एकनाथ खडसे

एकनाथ खडसे यांचे १२ आमदारांबाबत मोठं वक्तव्य

Eknath Khadse slams bjp and mns and appeal citizen what is going on in the state for the sake of entertainment

तळोदा : राज्याचे माजी विरोधी पक्ष नेते, माजी कॅबिनेट मंत्री एकनाथराव खडसे हे नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा शहराच्या दौऱ्यावर होते.

त्यावेळी त्यांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी केलेल्या विविध विकासकामांचे उदघाटन करत अनेक सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांनाही हजेरी लावली. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत एक मोठे विधान केले आहे.

राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी सरकारच्या वतीने जे १२ नाव प्रस्तावित केले आहेत. त्या १२ नावावर शिक्कामोर्तब फक्त माझ्या एका नावामुळे होत नाहीये. असे वक्तव्य करतानाच भविष्यात नंदुरबार जिल्ह्यातील अनेक मोठे चेहरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करतील तसेच भविष्यातील विधानसभा निवडणुकीत जिल्ह्याचे चित्र पालटलेले दिसेल असा विश्वासही व्यक्त केला.

महाविकास आघाडीने नगरपालिका निवडणुकीतही एकत्र यावे आणि स्थानिक नेतृत्वानेही राज्यपातळीवर जो निर्णय होईल त्याचे पालन करावे असे आवाहन खडसे यांनी केले.