घरमहाराष्ट्रनाशिकघोटी पाणीपुरवठा योजनेला तत्वतः मान्यता

घोटी पाणीपुरवठा योजनेला तत्वतः मान्यता

Subscribe

आमदार हिरामण खोसकर यांची मागणी

तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या घोटी शहराला जलजीवन मिशन अंतर्गत शहर पाणीपुरवठा योजनेला तत्वतः मान्यता मिळाल्याची माहिती आमदार हिरामण खोसकर यांनी दिली. २०१९ ला आमदार म्हणून निवडून आल्यानंतर या कामासाठी विशेष प्रयत्न करून योजना आकारास आणली.

या योजनेसाठी १७ कोटी ९९ लाख रुपयांची शासनाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे. राज्यस्तरीय तांत्रिक छाननी समितीने सदरची मान्यता दिली असून, पुढील अहवाल शासनास सादर करून लवकरच सुधारीत दरसूची प्रमाणे प्रशासकीय मान्यता मिळून कामास सुरुवात होईल, अशी माहितीही खोसकर यांनी दिली. ही योजना घोटी शहरात आणण्यासाठी इगतपुरी- त्र्यंबकेश्वरचे आमदार हिरामण खोसकर, जिल्हा परिषद सदस्य उदय जाधव यांनी परिश्रम घेतले असून त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पाणीपुरवठामंत्री गुबालराव पाटील, विधानसभा अध्यक्ष नरहरी झिरवाळ, पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे आदींनी याकामी सर्वतोपरी सहकार्य केल्याची माहिती आमदार खोसकर यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -