घरमहाराष्ट्रनाशिकतो कॉल ठरला अखेरचा, चिमुकलीची भेटही अधुरी..

तो कॉल ठरला अखेरचा, चिमुकलीची भेटही अधुरी..

Subscribe

नाशिकच्या जवानाचा जम्मू-काश्मीरमध्ये अपघाती मृत्यू, निवृत्तीला अवघे २५ दिवस राहिले असतानाच काळाचा घाला

सेवानिवृत्तीनंतर आपण तुझ्यसोबत राहणार.. साहेबांनी आणि मित्रांनी कार गिफ्ट केलीय. आल्यावर धम्माल करू बेटा… या शब्दांत पित्याने आपल्या चिमुकलीला शब्द दिला खरा, मात्र तो पूर्ण होण्यापूर्वीच काळाने घाला घातला आणि त्या लहानगीचं पितृछत्र हिरावलं गेलं.

अमळनेर तालुक्यातील पातोंडा (जि. जळगाव) येथील मूळ रहिवाशी आणि सध्या अंबडजवळील कन्फर्ट झोन सोसायटीत राहत असलेल्या गणेश सोनवणे या जवानाचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघे २५ दिवस शिल्लक असतानाच काळाने घाला घातला. सोनवणे यांच्या दोन भावांचे यापूर्वीच निधन झाले असल्याने सोनवणे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. काही दिवसांपूर्वीच गणेश सोनवणे यांनी फोनवर आपल्या मुलीशी गप्पा करत आपण लवकरच परतणार असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे तिचं स्वप्नही काळाने हिरावून नेलं.

- Advertisement -

एकीकडे घरचे सदस्य महिना संपण्याची वाट पाहात होते, तर दुसरीकडे स्वतः गणेश यांनाही घरी कधी परतणार आणि कुटूंबियांना भेटणार याची आतुरता होती. दरम्यान, ५ ऑगस्टला अनपेक्षितपणे सैन्यदलातील अधिकाऱ्यांनी फोनवरून जम्मू-काश्मीर येथील एका अपघातात गणेश सोनवणे यांचं निधन झाल्याची माहिती दिली. अचानक आलेल्या या बातमीने सोनवणे परिवाराला मोठा धक्का बसल्यानं सर्वांच्याच अश्रूंचा बांध फुटला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -