Friday, June 9, 2023
27 C
Mumbai
घर उत्तर महाराष्ट्र मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला शेतकरी चिंतेत

मका पिकावर लष्करी अळीचा हल्ला शेतकरी चिंतेत

Subscribe

लासलगाव : जिल्हाभरात सुरू असलेल्या समाधानकारक पावसामुळे पिके जोमाने आली असतानाच, लष्करी अळीच्या आक्रमणामुळे मका उत्पादक शेतकर्‍याची मात्र चांगलीच पाचावर धारण बसली आहे. या अळीच्या प्रादुर्भावामुळे मका उत्पादनात घट होण्याची भिती व्यक्त केली जाते आहे.

कांद्याची नगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगावजवळील ब्राह्मणगाव (विंचूर)सह निफाड तालुक्यातील अनेक गावांत पावसाळी मक्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली आहे. मक्याचे उत्पादन घेण्यापूर्वी पुढील पिकाचे नियोजन केले जाते. तसेच, जनावरांच्या चार्‍यासाठी मक्याची लागवड खासकरून केली जाते. यंदा पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे बहुतांश शेतकर्‍यांनी पावसाळी मक्याची लागवड केली. गेल्या 40 ते 45 दिवसांत येणार्‍या या मका पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या २० ते २५ दिवसांपासून पाऊस थांबून थांबून जोरदार बरसत असल्याने मका पिकावर कीटकनाशकांची फवारणी करूनही फायदा होत नाही. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात घट होणार असल्याने तसेच, जनावरांच्या चार्‍याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती मका उत्पादक शेतकरी करत आहेत.
या मका पिकासाठी मातीमोल बाजारभावाने कांद्याची विक्री करून पीक घेतले आहे. आता पुढे करावे काय, असा प्रश्न बळीराजासमोर उभा राहिला आहे. लष्करी अळीचा प्रादूर्भाव नियंत्रणासाठी शेतकर्‍यांकडून विविध उपाययोजना सुरू आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसानही होते आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -