Sunday, July 25, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर महाराष्ट्र नाशिक 'राजकीय नाटकांमुळे' नाट्यकर्मींचा संताप

‘राजकीय नाटकांमुळे’ नाट्यकर्मींचा संताप

राज्य शासनाकडून नाट्यकर्मींसोबत दुजाभाव केला असल्याचे सांगत नाट्यकर्मींनी व्यक्त केला रोष

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोनाचा संसर्ग ओसरल्याने लॉकडाऊन शिथिल करण्यात आले असून, दुकाने, लग्न समारंभास ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली आहे. मात्र, राज्यभर सभागृहांमध्ये नाट्यप्रयोग सादर करण्यास मनाई करण्यात आली असताना त्याच सभागृहांमध्ये राजकीय व्यक्तींच्या उपस्थितीत विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. त्यामुळे नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली आहे. राज्य शासनाकडून नाट्यकर्मींना दुजाभाव दिला जात आहे का, राज्य शासन इतर कार्यक्रमांना परवानगी दिली जात आहे मग आमच्या नाट्यप्रयोगांना परवानगी का दिली जात नाही, असा संतप्त प्रतिक्रिया नाट्यकर्मींनी व्यक्त केल्या आहेत.

राज्यभर कोरोनामुळे नाट्यगृह, सभागृहांमध्ये नाट्यप्रयोग सादर करण्यास बंदी करण्यास आली आहे. मात्र, याच नाट्यगृह, सभागृहांमध्ये महापालिकेसह संबंधित यंत्रणांमार्फत विविध कार्यक्रम आयोजित केला जात आहे. त्यामुळे नाट्यकर्मींमध्ये नाराजीची सूर उमटू लागला आहे. नाशिक महापालिकेच्या शहर बससेवेच उदघाटन ८ जुलै रोजी कालिदास कलामंदिर येथे राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, महापालिका आयुक्त कैलास जाधव, स्थायी समिती सभापती गणेश गिते, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, सभागृह नेते कमलेश बोडके, नगरसेविका दीक्षा लोंढे, माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपथित होते. या कार्यक्रमाच्या ठिकाणी कोरोना नियमांचे उल्लंघन होणार माहिती असतानाही महापालिकेने बससेवेचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमातही सोशल डिस्टन्सिंगचे उल्लंघन झाल्याचे दिसून आले. त्यामुळे नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

कालिदार कलामंदिरामध्ये मराठी कलाकारांसह स्थानिक कलाकारांचे नाट्यप्रयोग सादर केले जातात. मात्र, दोन वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कालिदार कलामंदिरामध्ये नाट्यप्रयोग सादरीकरणास बंदी आहे. त्याचा फटका नाट्यकर्मींना बसला असून, त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या बिकट परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा, असा प्रश्न नाट्यकर्मींसह इतरांना पडला आहे.

ठराविक नागरिकांच्या उपस्थितीत नाट्यप्रयोग सादर करण्यास परवानागी द्यावी, प्रयोगावेळी कोरोना नियमांचे सर्व पालन केले जाईल पण कला आणि नाट्यकर्मींना जीवंत ठेवण्यासाठी प्रयोगांना परवानगी द्यावी, अशी मागणी नाट्यकर्मी करत आहेत. तरीही, त्यांना राज्य शासनाकडून परवानगी दिली जात नाही. त्यातच कालिदास कलामंदिरामध्ये बससेवा उदघाटनाचा कार्यक्रम परवानगी देण्यात आली आणि कार्यक्रमही दणक्यात झाला. त्यामुळे नाट्यकर्मींमध्ये नाराजी पसरली आहे. शासनाने दुजाभाव न करता, नाट्यकर्मींना प्रयोग सादरीकरणार परवानगी द्यावी, असे मागणी नाट्यकर्मी करत आहेत.

- Advertisement -