अध्यक्षपदी डॉ. आत्माराम कुंभार्डे

जिल्हा परिषद, पंचायत समिती असोसिएशनची कार्यकारिणी जाहीर

ः जिल्हा परिषद, पंचायत समिती असोशिएशनच्या विभागीय बैठकीत जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर झाली असून, जिल्हाध्यक्षपदी डॉ.आत्माराम कुंभार्डे व कार्याध्यक्षपदी संजय बनकर यांची निवड झाली आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती असोशिएशनचे प्रदेशाध्यक्ष कैलास गारे-पाटील, कार्याध्यक्ष उदय बने, महिला प्रदेशाध्यक्षा अमृता पवार, कोकण अध्यक्ष सुभाष घरत, राज्य संघटक दिनकर पाटील यांच्या उपस्थितीत गुरूवारी (दि.१५) संघटनेची बैठक झाली. यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या अधिकारांसह विविध विषयांबाबत केंद्रीय पंचायत राजमंत्री, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना भेटण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अमृता पवार यांनी नाशिक जिल्ह्याची कार्यकारिणी घोषीत केली. यात डॉ. आत्माराम कुंभार्डे (जिल्हाध्यक्ष) जिल्हा परिषद सभापती संजय बनकर (कार्याध्यक्ष), यशवंत शिरसाठ (प्रसिध्दी प्रमुख), सिध्दार्थ वनारसे, समाधान हिरे, कावजी ठाकरे, उदय जाधव, सुरेश कमानकर (उपाध्यक्ष), महेंद्र काले (संघटक), दीपक शिरसाठ (सरचिटणीस), नयना गावित (महिला जिल्हाध्यक्षा), जिल्हा परिषद सभापती अश्विनी आहेर (महिला जिल्हा कार्याध्यक्षा), सिमंतिनी कोकाटे, सुनिता चारोस्कर, सविता पवार, पुष्पा धाकराव, कविता धाकराव (महिला जिल्हा उपाध्यक्ष), तालुकाध्यक्ष पुढीलप्रमाणे प्रविण गायकवाड (येवला), शिवा सुरासे (निफाड), रमेस बोरसे (नांदगाव), अरूण पाटील (मालेगाव), नितीन आहेर (चांदवड), साधना गवळी (सटाणा), गिताजंली पवार-गोळे (कळवण), एन. डी. गावित (सुरगाणा), भास्कर गावित (पेठ), भास्कर भगरे (दिंडोरी), मोतीराम दिवे (त्र्यंबकेश्वर), रत्नाकर चुंभळे (नाशिक), हरिदास लोहकरे (इगतपुरी), वैशाली खुळे (सिन्नर), नूतन आहेर (देवळा). याचा समावेश आहे. बैठकीस प्रदेश पदाधिकारी निलीमा पाटील, गोरख बोडके, रूपाजंली माळेकर, विनायक माळेकर यांसह नवनिर्वाचीत कार्यकारिणीतील पदाधिकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन अभिजीत साबळे यांनी केले.